एटीएम कार्ड ATM CARD म्हणजे काय?
ATM CARD = Automated Teller Machine Card
एटीएम हे प्लॅस्टिकचे कार्ड असते ज्याद्वारे ग्राहकाला बँकेकडून हे कार्ड दिले जाते. या एटीएम कार्डद्वारे दूरध्वनीच्या तारांनी किंवा इंटरनेट द्वारे ग्राहकाच्या बँक खात्याला जोडले जाते. यामुळे ग्राहक आपल्या बँकेत असलेल्या खातेमधून बँकेत न जाता एटीएम मशीनद्वारे बँक खात्यातून पैसे काढू शकतो. परंतु या कार्डचे वेगवेगळे प्रकार व महत्वाचे वेगवेगळे फायदे आहेत ते आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे.
बँकेकडून मिळणाऱ्या एटीएम कार्ड चे फायदे
बँकेकडून एटीएम कार्ड जारी होताच ग्राहकांना अपघात विमा आणि अकाली मृत्यू विमा मिळतो. याची माहिते फार कमी लोकांना असते. तसेच बँकाही ग्राहकांना अशी माहिती देण्यास टाळाटाळ करतात.परंतु कार्डधारक यांनी याबाबत माहिती विचारून घेणे गरजेचे आहे.
बँक ग्राहकाला एटीएम कार्ड जारी करताच, ग्राहकाला अपघात किंवा अकाली मृत्यूविरूद्ध विमा मिळतो. एटीएम कार्डच्या श्रेणीनुसार, तुम्हाला मिळणारी विम्याची रक्कम 1 ते 10 लाख रुपयांपर्यंत कार्ड प्रकारानुसार असू शकते. परंतु ग्राहकाला हे माहितीत नसल्यामुळे एटीएम कार्डधारकाचा अपघात किंवा अकाली मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना विम्याचा लाभ मिळत नाही.
एटीएम कार्डचे प्रकार व कोणत्या एटीएम कार्डवर किती विमा मिळतो?
- क्लासिक कार्डवर 1 लाख रुपये,
- प्लॅटिनम कार्डवर 2 लाख रुपये,
- प्लॅटिनम मास्टरकार्डवर 5 लाख रुपये,
- ऑर्डिनरी मास्टरकार्डवर 50 हजार रुपये,
- व्हिसा कार्डवर 1.5 लाख ते 2 लाख रुपयांपर्यंत तर दुसरीकडे, रुपे कार्डवर 1 ते 2 लाखांचा विमा उपलब्ध आहे.
महत्वाचे म्हणजे जर एटीएम कार्डधारक अपघाताचा बळी ठरला असेल. ज्यामध्ये जर तो एक हात किंवा पाय गमावला आणि अपंग झाला तर त्याला 50 हजार रुपयांचा विमा मिळतो. दोन्ही हात किंवा दोन्ही पाय गमावल्यास 1 लाख रुपयांचा विमा उपलब्ध आहे. मृत्यू झाल्यास 1 ते 5 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षणाची तरतूद आहे.
एटीएम कार्डधारकांना एटीएम कार्डनुसार, अपघात आणि अकाली मृत्यू विमा नियमानुसार ग्राहक 45 दिवसांपासून कोणत्याही राष्ट्रीयकृत किंवा गैर-राष्ट्रीयीकृत बँकेचे एटीएम वापरत असावा. एटीएम कार्डच्या श्रेणीनुसार विम्याची रक्कम दिली जाते.
विमालाभ साठी क्लेम कसा करावा?
एटीएम कार्डवर विम्याचा दावा करण्यासाठी, कार्डधारकाच्या नॉमिनीला/वारसाला संबंधित बँकेच्या शाखेत अर्ज करावा लागतो. ज्यामध्ये एफआयआरची प्रत, उपचाराचे प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यानंतर विमा दावा काही दिवसात खात्यात येतो. दुसरीकडे मृत्यू झाल्यास, कार्डधारकाच्या नॉमिनीला मृत्यू प्रमाणपत्र, एफआयआर प्रत, आश्रितांचे प्रमाणपत्र, मृताच्या प्रमाणपत्राची मूळ प्रत सादर करावी लागते. या संपूर्ण प्रक्रियेनंतर विम्याचा लाभ मिळतो.
कृपया ही महत्त्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा.
अशाच नवनवीन माहिती, शासकीय योजना, शेतकरी योजना,शासन नवीन जि आर माहिती माहिती आपल्या व्हाटसअपवर घरबसल्या मिळवण्यासाठी आमच्या ग्रुपला जॉइन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.