शेतकरी मित्रांनो हा लेख खूप महत्त्वाचा म्हणजे शासकीय मोजणी बाबत महत्त्वाची माहिती बघणार आहोत.
जर तुमची जमीन कमी भरत असेल किंवा जर तुमचा गट बदल झालेला असेल अशावेळी आपण नियमानुसार शासकीय मोजणीसाठी शासकीय मोजणीची फी भरून मोजणी करून घेऊ शकतो. अशावेळी आपल्याला जर आपल्या गटात दहा एकर जमीन असेल व गटात अजूनही शेतकरी असतील अशावेळी आपल्याला सर्व गटाची मोजणी फी भरून आपल्याला गट हा मोजणी करता येतो. यासाठी आपल्याला आपल्या जिल्हास्तरीय भूमी अभिलेख येथे जाऊन मोजणीची फी भरून सर्व गटातील शेतकऱ्यांना नोटीस बजावून दिलेल्या तारखेला मोजणी शासनातर्फे केली जाते.
शेत जमिनीची मोजणी व त्या आधारे येणारी क्षेत्र मोजमापे ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे स्वातंत्र्यपूर्वी काळात ब्रिटिश सरकारने संपूर्ण भारताचा टोफोग्राफिकल सर्वे केला होता. त्यामुळे देशातील पर्वत,नद्या,नाले,दर्या यांची समुद्रसपाटीपासून किती उंची आहे हे नकाशाद्वारे कळाले परंतु त्यानंतर प्रत्येक गावाच्या जमिनीमधून त्या जमिनीचे क्षेत्र एकत्र गावाच्या क्षेत्राची मेळ घालून व बरोबर असल्याची खात्री करून घेण्यात आली त्यानंतर अशा क्षेत्राची फोड गावठाण गायरान,नद्या,नाले,रस्ते व शेत जमिनीमध्ये नोंदणी करून मोजण्यात आले व प्रत्यक्ष जमिनीला एक क्रमांक देण्यात आला हा पहिल्यांदा देण्यात आलेला क्रमांक म्हणजे सर्वे नंबर. शिवाय जमिनीची हलकी भारी लक्षात घेऊन जमिनीवर आकार सुद्धा बसविण्यात आला वरील पद्धतीने सर्व संपूर्ण गावाची मोजणी झाली व त्याचे क्षेत्र जुळल्यानंतर गावाचा नकाशा तयार करण्यात आला गावाच्या नकाशाचे सर्वे नंबर रस्ते गावाची शिव नद्या,नाली इत्यादी दाखविण्यात आले. प्रत्येक जमीन शंकू साखळीच्या आधारे जी मोजमापे घेतली आहेत त्या मोजमापाच्या आधारे मूळ रेकॉर्ड जिल्ह्याच्या कार्यालयात कायमस्वरूपी जतन करण्यात आले. त्यामुळे आता जमिनीचे मोजणी करताना रेकॉर्डमधील नकाशा व मोजमापे यांचा विचार करून त्यांच्याशी सहमत होऊन तुलना करूनच जमीन मोजली जाते. ज्या गावांमध्ये एकत्रीकरण योजना अंमलात आली अशा गावांमध्ये सर्वे नंबर एकत्रीकरणानंतर त्यास गट नंबर असे कायम करण्यात आले त्यामुळे आपण सातबारावर व भुमापन क्रमांकच्या खाली असलेला नंबर एकतर गट नंबर असतो किंवा सर्वे नंबर असतो जमिनीची मोजणी करणे का आवश्यक असते शेतकऱ्यांच्या दृष्टीने आपल्या ताब्यात असलेली जमीन जेवढी आपली मालकीची आहे तेवढी जमीन आपल्या ताब्यात आहे किंवा नाही हे रेकॉर्ड कायम खात्रीशीर करण्याकरिता जमिनीची मोजणी केली जाते.
शेतकऱ्यांना शेत जमिनीची मोजणी करण्याची आवश्यकता असते.परंतु ही मोजणी ठराविक वेळी करण्याची गरज भासते.
1.जमिनीची वहिवाट वाटणी झाली नसलेली किंवा झाल्यानंतर प्रत्यक्षात वहिवाटीप्रमाणे वाटणी योग्य प्रमाणात/बरोबरीने आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी जमिनीची मोजणी केली जाते.
2.एखादी जमीन खरेदी किंवा विक्री केल्यास खरेदी/विक्री प्रमाणे निश्चित क्षेत्र काढण्यासाठी जमिनीची मोजणी केली जाते.
3.खाते फोड करून जमिनीचे वाटप करीत असताना सर्वांना समान प्रमाणात जमीन येण्यासाठी जमिनीची मोजणी केली जाते.
जमीन मोजणी करताना अर्जाच्या सोबत जोडाव्याची कागदपत्रे जमीन मोजणीचा अर्ज करताना जमीन निश्चितपणे मोजावयाची आहे व त्या संदर्भात संबंधी व्यक्ती कोण कोण आहे समजण्यासाठी अर्ज सोबत
आवश्यक कागदपत्रे
- मोजणी करावयाच्या आधी जमिनीलगत असणाऱ्या सर्व कब्जाधारकांचे संपूर्ण नावे,पत्ता,मोबाईल नंबर.
- ज्या जमीनची मोजणी करायची आहे त्या जमीनाचा चालू सातबारा व चालू महिन्यातील 8 अ चा उतारा.
- जमिनीची मोजणी ही नेहमीची किंवा तातडीची किंवा जास्त तातडीची असल्यास त्यानुसार भरावयाच्या मोजणीची चलन फी.
- अर्जावर सर्व अर्जदारांच्या सह्या व त्यांचे पूर्ण पत्ता.
- जमिनीच्या हद्दीतील किंवा वहिवाटीबद्दल ज्या बाजूचा वाद आहे त्याबाबतचा तपशील.
- ज्या जमिनीची मोजणी करावयाची आहे त्या जमिनीचा कच्चा नकाशा.
- अर्जामध्ये मोजण्याचे कारण स्पष्टपणे लिहिणे गरजेचे असते तर जमिनीची मोजणी करण्यात येणारी ही जमिनीची हद्द कायम करण्यासाठी आहे की वहिवाटीप्रमाणे क्षेत्र दर्शवण्यासाठी आहे की अतिक्रमण मोजणी नकाशा दर्शवण्यासाठी आहे किंवा पोटहिश्याची मोजणी करणे आहे हा तपशील विशिष्टपणे नमूद करणे आवश्यक असते.
शेतजमिनीची मोजणी कशी करतात?
कोणत्याही खातेदाराने मोजणी बाबतचा अर्ज भरल्यानंतर अशा मोजणी प्रकरणाला मोजणी रजिस्टर क्रमांक दिला जातो. त्यानंतर या प्रकरणांमध्ये त्या जमिनीबद्दलचे जे मूळ रेकॉर्ड कार्यालयात आहे त्यामुळे रेकॉर्डआधारे टिप्पण/फाळणी/एकत्रितरण जे झाले असेल त्या योजनेचानुसार उतारा तयार करून या प्रकरणांमध्ये लावला जातो व हे संपूर्ण प्रकरण मोजणी करणाऱ्या भुकरमापकाकडे/सर्वेअर दिले जाते. मोजणीसाठी प्राप्त झालेल्या अशा प्रकरणांमध्ये संबंधित भुकरमापक हा अर्ज करणाऱ्या व्यक्तींना व पत्ते देण्यात आलेल्या लगतच्या शेतकऱ्यांना मोजणीच्या अगोदर 15 दिवस रजिस्टर्ड पोस्टाने नोटीस पाठवून तारीख कळवतात.सर्वसाधारणपणे जून ते ऑक्टोबर या पावसाळी ऋतु टाळता उर्वरित काळात जमिनीच्या मोजणीचे काम सर्वेअर मार्फत केले जाते. प्रत्यक्ष मोजणीच्या दिवशी मोजणी करण्यासाठी भुकरमापकास मदतीसाठी लागणारे मजूर,निशानदार,चुना,हळद,दगड इत्यादी साहित्य व सुरक्षेसाठी पोलीस संबधित पोलिस स्टेशनला अर्ज करून अर्जदाराने स्वखर्चाने पुरविणे आवश्यक असते.
आजच्या युगात मोजणी करताना सर्व मोजणी सर्वेअर हे प्लेन टेबलद्वारे शेतजमिनीची मोजणी करतात. आशा वेळी प्रत्यक्ष जमिनीची लांबी रुंदी किंवा बांधाचा माप न घेता प्लेन टेबलवर मोजणीदार मोजणी नकाशा तंतोतंत वस्तूस्थिती प्रमाणे जुळवून तयार केले जाते. जमीन खालीवर,ओबाडधोबाड किंवा पाण्याचा संच असलेले नदी-नाले, ओढच्या जमीन तेथे निश्चित असे आकारमान प्लेन टेबलद्वारे काढण्यात येते. मोजणीसाठी आलेले सर्वेक्षण कर्मचारी व अधिकारी सर्वप्रथम ज्या जमिनीची मोजणी करायची आहे त्या जमिनीची पाहणी करून प्रत्यक्ष वहिवाट कोठे आहे याबाबत अर्जदार शेतकऱ्यास विचारना करून प्रत्यक्ष वहिवाटीप्रमाणे जुन्या हद्द व खुणा पाहून खुणा ठेवल्या जातात. त्यानंतर प्रत्यक्ष वहिवाटीप्रमाणे म्हणजे शेतकरी करत असलेल्या जमिनीची हद्द लक्षात यावी म्हणून खुणा ठेवून जमिनीमध्ये किंवा त्या गटाजवळ असलेल्या मुळ मोजणीच्या खुणा म्हणजे सर्वे नंबर चा दगड जुने झाड खोड किंवा बांधाचा दगड किंवा उरल्या याच्या आधारे जमिनीची मोजणी करण्यात येते.
जमिनीची मोजणी करताना अनेक वेळा अतिक्रमण जमीन असेल तर अतिक्रमण करणारा व्यक्ती गैरहजर असतो किंवा लगतचे शेतकरी गटातील शेतकरी हे गैरहजर असतात एखादी व्यक्ती मोजणीच्या वेळी हजर राहिली नसेल तर त्यांच्या गैरहजरमध्ये मोजणी करता येते परंतु मोजणी करण्यात येणारे लगतच्या शेतकऱ्यांना किंवा गटातील शेतकऱ्यांना नोटीस आधी बजावने आवश्यक असते आणि जर तो व्यक्ती नोटीस घेण्यास नकार देत असेल अशावेळी संबंधित अधिकाऱ्यांना किंवा ज्या शेतकऱ्याला मोजणी करायची आहे त्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांना ही मोजणी करावीच लागते जमिनीची मोजणी करताना मोजणीच्या आधारे प्लेन टेबलवर आपोआप जमिनीच्या खुणा व नकाशा तयार होतो तसेच जमीन मोजणी करताना मोजणीच्या संदर्भात अर्जदारासह इतर सर्व संबंधित शेतकऱ्यांचा जवाब सर्वेअर मार्फत घेतला जातो. जर एखादा व्यक्तीने/शेतकऱ्याने जवाब दिल्यास नकार दिला तर तसा पंचनामा मध्ये उल्लेख करतात. प्लेन टेबलच्या आधारे होणारी जमिनीची मोजणी ही जमिनीच्या मूळ रेकॉर्डची तुलना करून प्रथम पाहिले जाते. कधीकधी जमिनीची मोजणी झाले की लगेच हद्दीच्या खुणा न दाखवता तालुकास्तरीय मूळ रेकॉर्डशी तुलना करून त्या क्षेत्राचा एकमेकांशी तुलना करून काही दिवसानंतर जमिनीच्या हद्दी दाखविल्या जातात. त्या जमिनीच्या हद्दी दाखवल्यानंतर अर्जदाराने हद्दीच्या खुणा दगड निशाणी म्हणून हद्द कायम करून खुणांप्रमाणे अर्जदाराला/अतिक्रमनधारकाला/गटातील शेतकऱ्याला मान्य करणे अपेक्षित असते.
मोजणीनंतरची कार्यवाही
अशा पद्धतीने जमिनीची मोजणी झाल्यानंतर प्रत्यक्ष हद्दी पुन्हा दाखविल्यानंतर तालुका कार्यालयात मोजणी नकाशाच्या दोन प्रती तयार केल्या जातात व मोजणी नकाशा मध्ये मोजणी अर्जदाराचे नाव, मोजणीची तारीख, नकाशाच्या दिशा, हद्द दाखविल्याचा दिनांक, नकाशाचे स्केल, सर्वेअरचे नाव व त्यावर सही शिका इत्यादी महत्त्वाचा तपशील रेकॉर्डमध्ये नोंद केला जातो तसेच जर वहीवाटेची हद्द आणि सर्वेअर चे रेषेप्रमाणे येणारी हद्द या वेगवेगळ्या असती तर अशी वहिवाटीची हद्द व रेषेप्रमाणे ची हद्द ही सलगरेषेने वेगवेगळ्या दोन दाखवली जाते. तसेच यामध्ये अतिक्रमणाचे क्षेत्र हे रंगाने रंगवून दाखवले जाते जर मोजणी नकाशावर सुद्धा——ही वहिवाटेचे हद्द असून——ही रेकॉर्डची हद्द आहे व क रंगाने दाखवलेले क्षेत्र ह—-गट नंबर—मधील असून त्यामध्ये—-गट नंबरच्या मालकाने अतिक्रमण केले आहे. असा उल्लेख केला जातो अशा पद्धतीने मोजणीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराचा अर्ज निकाली काढून नकाशाची एक प्रत दिली जाते व एक प्रत ही तालुका मोजणी कार्यालयात जमा केली जाते.
जमिनीची मोजणी झाल्यानंतर सर्वेअरने हद्दी पुन्हा दाखविल्यानंतरही मोजणी मान्य नसेल तर मूळ मोजणीच्या विरोधात अपील करण्याची तरतूद आहे. याद्वारे अपील करण्यासाठी तालुका निरीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे अर्ज करावा लागतो व या अर्जावरून स्वतः तालुका निरीक्षक हे पुन्हा केलेल्या मोजणीची परत खात्री करून स्वतंत्र मोजणी करून जमिनीच्या हद्द दाखवतात याच प्रक्रियेला निमताना मोजणी असे म्हणतात.
निमताना मोजणी झाल्यानंतरही काही वेळा लगतचे शेतकरी बांध कोरत असल्यास किंवा अतिक्रमण केल्यास तसेच जमिनीची मोजणी होऊन सुद्धा ही प्रत्यक्ष अतिक्रमण केलेले शेतकरी यांच्याकडून क्षेत्र किंवा कब्जा वहिवाटीस मिळत नाही व त्यामुळे प्रत्यक्ष न्याय मिळत नाही. अशावेळी लगतच्या खातेदार किंवा अतिक्रमण किंवा कब्जेदार या मोजणीवर अविश्वास दाखवतात व मोजणी मान्य करत नाही तसेच ताबा सोडण्यास नाकार देतात अशा वेळी मोजणी केलेल्या खातेदाराने त्वरित महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानच्या कलम 138 नुसार अतिक्रमण क्षेत्राचा ताबा मिळवण्यासाठी त्वरित प्रांतआधिकारी यांना अर्ज करावा व त्याचबरोबर मोजणी झालेल्या रेकॉर्डची प्रती व नकाशा जोडून अर्ज करावा. यापुढेही जाऊन आपल्याला कोर्टात अतिक्रमण क्षेत्राचा ताबा मिळवण्यासाठी अपील करता येते.