महाराष्ट्र लेक लाडकी योजना काय आहे What is Maharashtra Lek Ladki Yojana?, लेक लाडकी योजना महाराष्ट्र, योजनेचे फायदे आणि वैशिष्टे Lek Ladki Yojana Maharashtra, Benefits and Features of the Yojana, ऑनलाइन अर्ज Maharashtra Lek Ladki Scheme Online Application, महाराष्ट्र लेक लाडकी योजना लाभार्थी Maharashtra Lek Ladki Yojana Beneficiary, महाराष्ट्र लेक लाडकी योजना पात्रता Maharashtra Lek Ladki Scheme Eligibility, महाराष्ट्र लेक लाडकी योजना आवश्यक कागदपत्रे Maharashtra Lek Ladki Yojana Documents, अधिकृत वेबसाइट Lek Ladaki Yojna Online Website महाराष्ट्र लेक लाडकी योजना अर्ज कसा करावा How to Apply Maharashtra Lek Ladki Yojana? (महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023 मराठी मध्ये) लेक लाडकी योजना महाराष्ट्र, फॉर्म पीडीएफ, मुख्य मुद्दे, पात्रता निकष, लाभार्थी, आवश्यक कागदपत्रे, अधिकृत वेबसाइट, हेल्पलाइन क्रमांक या सर्व विषयावर आज आपण माहिती बघणार आहोत तर मित्रांनो त्यासाठी माहिती आपण पूर्ण पहा आणि माहिती आवडल्यास नक्की इतरांना ही माहिती पाठवा.
महाराष्ट्र लेक लाडकी योजना काय आहे What is Maharashtra Lek Ladki Yojana?
लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023 ही महाराष्ट्र शासनाने 2023 मध्ये सुरू केली आहे. या योजनेंतर्गत, राज्यातील अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना जन्मापासून ते 18 वर्षे वयापर्यंतच्या वेगवेगळ्या टप्प्यात एकूण रु. 1 लाख 1 हजार (रु. 101000/-) आर्थिक सहाय्य दिले जाईल. ही योजना १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींना लागू होईल.
राज्यात पैशाअभावी अनेकदा मुलींचे शिक्षण पूर्ण होत नाही, त्यामुळे अनेकदा मुलींची लग्न लवकर होतात. हे लक्षात घेऊन राज्य सरकारने मुलींचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी लेक लाडकी योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ राज्यातील पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारकांना मिळणार आहे. अशा कार्डधारक कुटुंबात मुलगी जन्माला आल्यास तिच्या जन्मानंतर 5,000/- रुपयांची मदत दिली जाईल.
यानंतर, मुलगी शाळेत जायला लागल्यावर तिला प्रथम वर्गात 4,000/- रुपये सरकारकडून दिले जातील. सहाव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीला 6,000/- रुपयांची सरकारी मदत मिळेल. 8,000/- इयत्ता अकरावीला दिले जातील. मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तिला राज्य सरकारकडून 75 हजार रुपये दिले जातील. अशा प्रकारे मुलीला एकूण 1 लाख 1 हजार रुपये मिळणार आहेत.
लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023 मध्ये अर्ज करून (ऑनलाईन अर्ज) या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर सर्व माहिती खाली दिली आहे जसे की: अर्ज कसा करायचा, आवश्यक कागदपत्रे, अधिकृत वेबसाइट, योजनेचे फायदे, पात्रता इ.
याशिवाय केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या सर्व सरकारी योजनांची माहिती तुम्ही maharashtrayojna.com आमच्या या वेबसाईटवर निशुल्क उपलब्ध आहे आणि आपल्याला नवनवीन योजनांची माहितीचे अपडेट्स मिळवण्यासाठी व्हाटसअप ग्रुप जॉइन करा.
माझी लाडकी बहीण योजना म्हणजे काय? कोणाला व कसा मिळणार लाभ?
लेक लाडकी योजना महाराष्ट्र, योजनेचे फायदे आणि वैशिष्टे Lek Ladki Yojana Maharashtra, Benefits and Features of the Yojana
1. महाराष्ट्रातील गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना योजनेचा लाभ दिला जाईल.
2. या योजनेंतर्गत मुलींना जन्मापासून ते 18 वर्षे वयापर्यंतच्या वेगवेगळ्या टप्प्यात एकूण 1 लाख 1 हजार रुपये दिले जातील.
3. संपूर्ण रक्कम बँक खात्यात पाठवली जाईल.
4. जर कोणाच्या घरी जुळ्या मुलीचा जन्म झाला तर त्याचा फायदा दोन्ही मुलींना होतो.
5. जर कोणाला मुलगा आणि मुलगी असेल तर फक्त मुलीलाच लाभ मिळेल.
6. महाराष्ट्रात 15 हजार ते 1 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना केशरी रेशन कार्ड दिले जाईल. याशिवाय शहरी भागात 15 हजार रुपये कमावणाऱ्यांना पिवळे रेशनकार्ड दिले जाते.
7.1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलीला योजनेचा लाभ मिळेल.
8 .कुपोषित कमी करण्यास
9.मुलींचा मृत्यू दर कमी करण्यास.
9.बालविवाह रोखण्यास.
लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023 साठी पात्रता निकष- Eligibility Criteria for Lek Ladki Yojana Maharashtra 2023
1. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
2. लेख लाडकी योजनेसाठी राज्यातील फक्त मुलीच पात्र असतील.
3. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
4. राज्यातील पिवळे आणि केशरी शिधापत्रिका असलेल्या मुलींचे कुटुंबच या योजनेसाठी पात्र असतील.
5. 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलीला योजनेचा लाभ मिळेल.
लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023 आवश्यक कागदपत्रे- Maharashtra Lek Ladki Yojana Documents
1. पिवळा किंवा केशरी रंगाचे शिधापत्रिका
2. मुलीच्या पालकांचे आधार कार्ड
3. पालकांसह मुलीचा फोटो
4. अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
5. रहिवास प्रमाणपत्र
6. उत्पन्नाचे प्रमाणपत्र
7. मोबाईल नंबर
8. ईमेल आयडी
9. बँक पासबुक
10.मुलीचे जन्मचे प्रमाणपत्र
लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023 अर्ज कसा करावा? How to Apply Maharashtra Lek Ladki Yojana?
महाराष्ट्र लेक लाडकी योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करायचा lek ladaki yojna 2023 online apply link असेल तर तुम्हाला लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023 PDF फॉर्म भरून,सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन अंगणवाडी सेविका /पर्यवेशिक/मुख्यसेविका यांच्याकडे जायचे आहे. यानंतर तुमची नोंदणी यांच्यामार्फत करण्यात येईल. नोंदणी केल्यानंतर तुम्हाला नोंदणीची भरलेला अर्जकिंवा पोचपावती दिले जाईल.
लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023 PDF फॉर्म
लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023 लाभ प्रक्रिया- Lek Ladki Yojana Maharashtra 2023 Benefit Process
सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना विविध टप्प्यावर देण्यात येणारा लाभ थेट लाभार्थी हस्तांतरण (DBT) द्वारे देण्यात येईल. त्याकरिता महिला व बाल विकास विभाग स्तरावरून निश्चित करण्यात आलेल्या बँकेमध्ये आयुक्तालय स्तरावर खाते उघडण्यात येऊन त्यामधून पोर्टलप्रमाणे लाभार्थ्यांना लाभ अनुज्ञेय करण्याकरिता ग्रामीण क्षेत्राच्या बाबतीत जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास), जिल्हा परिषद यांना तर नागरी क्षेत्राच्या बाबतीत बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) यांना आवश्यक निधी वर्ग करण्यात येईल व ते थेट लाभार्थी हस्तांतरण (DBT) द्वारे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करतील. त्याकरिता लाभार्थी व माता यांचे संयुक्त बँक खाते उघडणे अनिवार्य राहील. एखाद्या प्रकरणी मातेचा मृत्यू झालेला असल्यास लाभार्थी व पिता यांचे संयुक्त खाते उघडण्यात यावे. मात्र, अशा प्रकरणात अर्ज सादर करतांना मातेचे मृत्यू प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. अनाथ मुलींना लाभ देताना विभागाच्या इतर योजनांचा लाभ ज्या पध्दतीने त्यांना देण्यात येतो, त्याप्रमाणे कार्यवाही करावी.
एखादे लाभार्थी कुटुंब या योजनेमधील एक अथवा काही टप्प्यांचा लाभ घेतल्यानंतर राज्यातील अन्य जिल्ह्यात स्थलांतरीत झाले असेल तर पुढील टप्प्यातील लाभ अनुज्ञेय होण्याकरिता त्यांनी स्थलांतर झालेल्या जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील अधिकारी यांचेकडे अर्ज सादर करावा. सदर अर्जाची संबंधित अधिका-यांनी छाननी करून पात्र ठरत असल्यास राज्य कक्षाकडे शिफ़ारस करावी व राज्य कक्षाकडून अंतिम निर्णय घेण्यात यावा. त्याचप्रमाणे एखादे लाभार्थी कुटुंब या योजनेमधील एक अथवा काही टप्प्यांचा लाभ घेतल्यानंतर राज्याबाहेर स्थलांतरित झाले असल्यास त्यांनी थेट राज्य कक्षाकडे अर्ज सादर करावा व राज्य कक्षाने याबाबत अंतिम निर्णय घ्यावा.
माझी कन्या भाग्यश्री योजना म्हणजे काय कसा घ्याल लाभ?
प्र. महाराष्ट्र लेक लाडकी योजना काय आहे? What is Maharashtra Lek Ladki Yojana?
या योजनेंतर्गत राज्यातील शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या गटांना 50% अनुदानावर 3 अश्वशक्ती किंवा त्याहून अधिक क्षमतेचे कायमस्वरूपी कृषी पंप कनेक्शन दिले जाईल.
प्र. महाराष्ट्र लेक लाडकी योजनेची पात्रता काय आहे? Q. What is the Eligibility of Maharashtra Lek Ladki Yojana?
महाराष्ट्र राज्यातील पिवळे आणि केशरी शिधापत्रिका असलेल्या मुलीच या योजनेसाठी पात्र आहेत.
प्र. लेक लाडकी योजनेचा फॉर्म कसा भरायचा? How to fill the form of Lek Ladki Yojana?
लेक लाडकी योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी, तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करावी लागेल. त्याची संपूर्ण प्रक्रिया वर दिली जाईल.
प्र. महाराष्ट्र लेक लाडकी योजनेचा लाभ कोणाला मिळणार? Who will benefit from Maharashtra Lek Ladki Yojana?
या योजनेचा लाभ प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या सर्व गरीब कुटुंबातील मुलींना दिला जाईल ज्यांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षण घेता येत नाही.
प्र. महाराष्ट्र लेक लाडकी योजना कधी जाहीर करण्यात आली? When was Maharashtra Lek Ladki Yojana announced?
महाराष्ट्रात 2023 मध्ये या लेक लाडकी योजना Lek Ladaki Yojna 2023 योजनेची आंमलबजावणी करण्यात आली.