नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे महाराष्ट्र योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Vasantrao Naik Karj Yojana वसंतराव नाईक कर्ज योजना बद्दल माहिती यामध्ये वसंतराव नाईक कर्ज योजना महामंडळाची स्थापना,वसंतराव नाईक कर्ज योजना उद्देश,वसंतराव नाईक कर्ज योजना लाभार्थीच्या पात्रतेच्या अटी,वसंतराव नाईक कर्ज योजना परताव्याच्या अटी,वसंतराव नाईक कर्ज योजना महामंडळामार्फत लाभार्थ्यांस कर्जाच्या व्याज रकमेचा परतावा,वसंतराव नाईक कर्ज योजना लाभार्थी अटी व शर्ती,वसंतराव नाईक कर्ज योजनेचा लाभ,वसंतराव नाईक कर्ज योजनेसाठी लागणारी कागदपत्रे,वसंतराव नाईक कर्ज योजना या योजनेअंतर्गत कोणत्या उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदान देण्यात येते? याबाबत संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत यासाठी लेख शेवटपर्यंत वाचा.
वसंतराव नाईक कर्ज योजना महामंडळाची स्थापना
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, मर्यादित मुंबई या महामंडळाची स्थापना दिनांक 8 फेब्रुवारी, 1984 रोजी कायदा, 1956 नुसार महामंडळाची स्थापना करण्यात आली सदर महामंडळ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिनस्त कार्यरत करते. शासन अधिसूचना दिनांक 10 मार्च, 2019 अन्वये सामाजिक न्याय विभागातून इतर मागासवर्ग सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग या स्वतंत्र विभागची स्थापना करण्यात आली. शासन निर्णय क्रमांक इमाव 2016/प्र.क्र.95/आस्थापना, दि.24 जुलै, 2019 नुसार यास इतर मागास “बहुजन कल्याण विभाग” असे नामकरण करण्यात आले. सदर विभागाच्या अधिनस्त वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ कार्यरत आहे.
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्ग प्रवर्गाच्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींना सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उन्नतीकरिता विविध व्यवसाय करण्याकरिता बिनव्याजी कर्ज अनुदान स्वरूपात दिले जाते. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ (मर्यादित) आणि वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्यादित) या दोन्ही महामंडळांमार्फत राबविण्यास योजनेत इतर मागासवर्ग प्रवर्गातील महामंडळाच्या निकषांनुसार विहीत केलेल्य वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांना या योजनेतून आर्थिक सहाय्य दिले जाते. तसेच बचत गट, भागीदारी संस्था, कंपनी अधिनियम २०१३ अंतर्गत), LLP(मर्यादित दायित्व भागीदारी), FPO (शेतकरी उत्पादक संघटना) अशा शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्थांना बँकेतर्फे स्वयंरोजगार उद्योग उभारणी करिता कर्ज दिले जाते, त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणीकरणानुसार महामंडळाकडून परत केला जातो.
वसंतराव नाईक कर्ज योजना उद्देश:-
- बँकेमार्फत लाभार्थीना रु.१०.०० लक्ष पर्यंत रक्कम वितरीत केली जाईल. सदर कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणिकरणानुसार (जास्तीत जास्त १२% पर्यंत) महामंडळाकडून केला जाईल.
- महामंडळाच्या योजने करीता लाभार्थीच्या पात्रतेसाठी उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागाकरीता रु. १.०० लाख कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे. सदर उत्पन्न मर्यादेत वाढ करुन कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा इतर मागास प्रवर्गासाठी नॉन क्रिमीलेअर करीता असलेल्या रु. ८.०० लाख पर्यंत राहील. (सक्षम प्राधिकरणाने वेळोवेळी दिलेल्या नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रानुसार)
- सर्व जिल्हा कार्यालयांना समान भौतिक व आर्थिक उद्दिष्ट देण्यात येईल. तथापि, योग्य व सक्षम लाभार्थी आल्यास ते जिल्हानिहाय कमी अधिक करून मुख्यालयाच्या परवानगीने त्यात बदल करता येईल.
- प्रति जिल्हा किमान १०० लाभार्थीना सरासरी रु.१०.०० लक्ष प्रकल्प किंमतीचे प्रस्ताव मंजूर याप्रमाणे प्रति जिल्हा रु. १०.०० कोटी मंजूर प्रकरणात सर्व ३६ जिल्हयातील प्रति वर्षी बँकेमार्फत मंजूर ३६०० लाभार्थीना रु. ३६०.०० कोटी निधी बँकेमार्फत वितरीत केला जातो.
वसंतराव नाईक कर्ज योजना लाभार्थीच्या पात्रतेच्या अटी:-
- महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- लाभार्थींचे कर्ज खाते आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य राहील.
- वेबपोर्टल/ महामंडळाच्या संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य.
- उमेदवाराने अर्ज करतेवेळी या प्रकल्पासाठी व यापुर्वी महामंडळाच्या किंवा इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- उमेदवार कोणत्याही बँकेचा / वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
- उमेदवाराने कर्ज प्रकरण हे सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (पीएफएमएस) अथवा तत्सम संगणक प्रणालीद्वारे प्रकरण हाताळण्यास सक्षम असलेल्या बँकेत केलेले असावे.
- कुटुंबातील एका व्यक्तीला केवळ एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल.
- शासन मान्य बचत गट (इतर कोणत्याही शासकीय योजनेत मान्य असलेले)
- कंपनी/Limited Liability Partnership (LLP) / Society (कंपनी कायदा, २०१३ च्या Web Portalनुसार)
- ही योजना सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या व्यवसायाच्या विस्तारासाठी व योजनेची अंमलबजावणी सुरु केल्यानंतर स्थापन झालेल्या नवीन उद्योगांसाठी लागू असते.
- गटाच्या भागीदारांचे किमान रु.५०० कोटीच्या वर ठेवी असलेल्या व कोअर बँकींग सिस्टम असलेल्या राष्ट्रीयकृत/शेड्युल्ड बँकेत खाते असावे.
- गटातील सर्व सदस्यांचा सिबिल क्रेडीट स्कोअर किमान ५०० इतका असावा.
- गटातील उमेदवारांची महामंडळाच्या अधिकृत वेबपार्टलवर अर्ज सादर करणे बंधनकारक असेल.
- लाभार्थी अर्जदाराचे वय किमान 18 ते 55 दरम्यान असणे गरजेचे आहे.
- अर्जदार हा विमुक्त जाती, भटक्या जाती, विशेष मागास प्रवर्गातील असणे अनिवार्य आहे.
वसंतराव नाईक कर्ज योजना परताव्याच्या अटी
- जर लाभार्थ्याने मध्येच नियमित कर्ज परतफेड नाही केली तर व्याज परतावा दिला जाणार नाही.
- लाभार्थ्याने ऑनलाईन पोर्टलवर उद्योग सुरु असल्याचे किमान दोन फोटो अपलोड करावेत.
- लाभार्थीना अदा करण्यात येणारी व्याज परतावाची रक्कम अनुदान स्वरुपात अदा करण्यात येईल.
वसंतराव नाईक कर्ज योजना महामंडळामार्फत लाभार्थ्यांस कर्जाच्या व्याज रकमेचा परतावा
- उमेदवाराने वेळेत कर्जाचे हप्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम (१२ टक्के मर्यादेत) त्याच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल.
- सदर योजना (पीएफएमएस) संगणक प्रणालीद्वारे संपुर्णपणे संगणकीकृत असुन प्रक्रिया सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली राबविण्यात येते.
- महामंडळ केवळ बँकेने वेळेत वसुल केलेली योग्य व्याज रक्कम अदा करेल, याऐवजी इतर कोणतेही Charges/Fees/देयके अदा करणार नाही.
- उमेदवारांची नांव नोंदणी – उमेदावारांनी शासनाच्या अधिकृत वेबपोर्टलवर अर्ज सादर करणे बंधनकारक असेल प्रस्ताव सादर केल्यावर दिलेल्या अटी व शर्ती नुसार प्रस्ताव पात्र ठरत असल्यास उमेदवारास संगणकीकृत सशर्त हेतूपत्र (Letter of intent) / मंजूरीपत्र दिले जाईल.
- उमेदवाराने या आधारे बँकेकडून कर्ज प्रकरणांवर कर्ज मंजूर करुन घ्यावे.
- या व्याज परतावा योजनेचा लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येत या समितीत लाभार्थ्यांनी कर्ज घेतले बँकेकडून त्या बँकेचे व्यवस्थापक, संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण हे सदस्य व संबंधित महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सदस्य सचिव या योजनेंतर्गत संपुर्ण कर्ज रक्कम बँक देणार असल्याने सदर प्रस्ताव जिल्हा लाभार्थी निवड या समितीमार्फत करण्यात येते.
वसंतराव नाईक कर्ज योजना लाभार्थी अटी व शर्ती :-
- गटातील लाभार्थी हे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- गटातील लाभार्थ्यांचे कर्ज खाते आधारकार्ड लिंक असणे अनिवार्य राहील.
- गटातील लाभार्थ्यांचे किमान वय १८ ते ४५ वर्षे असावे.
- गटातील लाभार्थ्यांचे महामंडळाच्या वेबपोर्टलवर महामंडळाच्या संगणक प्रणालीवर नांव नोंदणी अनिवार्य.
- गटातील सर्व लाभार्थ्यांचे प्रमाणित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न, नॉन-क्रिमीलेअर करीता असलेल्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु.८.०० लाखाच्या मर्यादेत (सक्षम प्राधिकरणने वेळोवळी दिलेल्या प्रमाणपत्रानुसार) असावे.
वसंतराव नाईक कर्ज योजनेचा लाभ
या योजनेंतर्गत राज्यातील भटक्या जाती, विमुक्त जाती, विशेष मागास प्रवर्ग आणि निराधार महिलांना त्वरित कर्ज योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेंतर्गत लाभार्थ्याला स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेंतर्गत प्राधान्य मिळण्यासाठी तुम्ही शासकीय किंवा निमशासकीयाकडून शासकीय विकास बँकेमार्फत प्रमाणपत्र व तांत्रिक प्रशिक्षण घेतलेले असावे.वसंतराव नाईक कर्ज योजनेत सरकारचा 100 टक्के सहभाग आहे.
Vasantrao Naik Karj Yojana Documents योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- आधारकार्ड
- पॅनकार्ड
- मोबाईल क्रमांक
- ईमेल आयडी
- डोमिसाईल प्रमाणपत्र
- रेशनकार्ड
- रहिवाशी दाखला
- उत्पन्न प्रमाणपत्र (1 लाखाच्या आत)
- बँक खाते
- व्यवसाय कोटेषण
- मतदान कार्ड
- जातीचा दाखला
वसंतराव नाईक कर्ज योजना या योजनेअंतर्गत उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदान देण्यात येते?
- पिठाची गिरणी
- किरण दुकान
- फॅबरिकेशन
- आठवडी बाजार दुकान
- सलून
- मसाला उद्योग
- मसाला उद्योग
- मिरची कांडप उद्योग
- पापड उद्योग
- ब्युटीपार्लर
- स्टेशनरी
- चिकन शॉप
- स्वीट मार्ट
- चहा टपरी
- झेरॉक्स
- मत्स्य व्यवसाय
- कृषी व्यवसाय
- मोबाईल रिपेरिंअग
- ऑटो रिपेरिंअग वर्क शॉप
- टायपिंग इन्स्टिट्युट
- गॅरेज
- फ्रिज- ए सी दुरुस्ती
- वाहन दुरुस्ती
- फळ- भाजीपाला विक्रेते
- कापड विक्रेते
- आइस्क्रीम पार्लर
- किराणा दुकान
- हॉटेल
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया
Vasanta Rao Naik Mahamndal Karja Yojana Online Registration Process
सर्वप्रथम तुम्हाला http://www.vjnt.in/ या लिंक वर जायचे आहे.
त्यानंतर तुम्हाला नवीन नोंदणी साठी दिलेला सर्व फॉर्म भरून कागदपत्रे आपलोड करणे आहे. व आपला फॉर्म भरून झाल्यानंतर सर्व कागदपत्रे जोडून बँकेत व साबधित विभागाला जमा करायचे आहे.
तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर इतरांना नक्की पाठवा.