आपल्या भारत देशात आपण बघतो आपल्या आजूबाजूचे परिसरात दिव्यांग व अपंग व्यक्ती आपल्याला बेवारस पणे पहायला मिळतात. अशा बेवारस लोकांना तुच्छतेने बघितले जाते. अशा मुळे समाजात काम करण्यास दिव्यांग असलेल्याना रोजगार मिळणे ही अतिशय कठीण असते. यामुळे काही दिव्यांग व्यक्तीवर कुटुंबाची जबाबदारी असते. त्यामुळे त्यांना जगात सावरण्याची,प्रगती करण्याची,आर्थिक मदतीची साथ म्हणून शासनाकडून दिव्यांगाना शासन काही योजना आखत असतात. शासनाच्या या योजनेमधील दिव्यांगांसाठी एक योजनाबाबत आपण माहिती बघणार आहोत.
मित्रांनो आजच्या लेखमध्ये जर तुम्ही दिव्यांग असाल किंवा तुमच्या घरातील आजूबाजूच्या परिसरातील कुणीही व्यक्ति दिव्यांग असेल तर त्यांच्यासाठी ही माहिती अतिशय उपयुक्त आहे. यासाठी
राज्यातील दिव्यांग व्यक्तींना पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई- व्हेईकल) मोफत उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनेची अंमलबजावणी संदर्भाने दिव्यांग अर्जदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ योजनेचे स्वरूप
या योजने महाराष्ट्र शासनाकडून हरित ऊर्जेवर चालणारी फिरत्या वाहनांवरील दुकानां करिता प्रत्येक लाभार्थ्याला ३.७५ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. यामध्ये योजनेची अंमलबजावणी करून निवडलेल्या स्वयंसेवी संस्थेने वाहनाची देखभाल दुरुस्ती करणे, निवड केलेल्या व्यवसायाच्या दिव्यांगांना व्यवसाय प्रशिक्षण देणे, वाहनाची प्रादेशिक, उपप्रादेशिक व परिवहन विभागाकडे नोंदणी करणे, दिव्यांग लाभार्थ्यांना परवाना देण्यास नाकारल्यास त्याच्या वतीने वाहन चालवणाऱ्या सामान्य व्यक्तीला वाहन चालविण्याचा परवाना मिळवून देणे, वाहन विमा उतरवणे, संबंधित महानगरपालिका/ नगरपालिका, नगर परिषदा, ग्रामपंचायत यांच्याकडून फिरता व्यवसाय परवाना मिळवून देणे अशी कामे करणे या संस्थेमार्फत बंधनकारक असते. संबंधित विभागाचे जिल्हा प्रशासन, दिव्यांग वित्त व विकास महामंडळ किंवा महामंडळ प्रशासकीय संचालकांनी स्वयंसेवी संस्था नियुक्त केली आहे.या स्वयंसेवी संस्थामार्फत यी योजना चालवली जाते.
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ योजनेत मिळणारे लाभ
प्रशासकीय संचालक, महाराष्ट्र राज्य दिव्यांग महामंडळाच्या नियंत्रणात वित्तीय विकासाची अंमलबजावणी केली जाते. फिरते वाहन खरेदी-प्रशासकीय खरेदी-विक्री धोरणानुसार विहित गावाचा अवलंब करून प्रशासकीय संचालक, दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून फिरत्या वाहनांची खरेदी केली जाते. व्यवसायाचे प्रकार – सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या १० जून २०१९ च्या शासननिर्णयाच्या उदाहरणादाखल काही व्यवसायाचे प्रकार निश्चित करून दिले आहेत ज्या व्यवसायासाठी दिव्यांगांना प्रोत्साहन देत आहेत. पाणीपुरी, इडली, डोसा, वडा सांबर, फळांचे रस, बे उत्पादने, पावभाजी, स्क्रीम/ बर्फाचा सुरू असलेल्या फळांचा दुकान, भापा कंपनीचे दुकान हे व्यवसाय खाद्यपदार्थांतर्गत दर्शवतात. किरकोळ व्यवसायात किरणा भुसार, स्टेशनरी, पूजा साहित्य, बूट व बॅग सर्व, साफसफाई साधनांची विक्री, किरकोळ वस्तु भंडार, रद्दी भंगार वस्तु, वन उत्पादने, कापडी पिशव्या, उपयोग इ. व्यवसाय करता. – सर्व आणि इतर व्यवसायांमध्ये मोबाइल मालक, फिरते केशकर्तनालय, विद्युत उपकरणे दुकान आणि घड्याळ संपूर्ण. पर्यटनासाठी वाहन पुरवणे हा व्यवसाय करता येईल.
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ योजनेच्या अटी व शर्ती-Terms and conditions of the scheme
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा
- अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान ४०% टक्के असावे तसेच जिल्हा शल्य चिकित्सक / सक्षम प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्रधारक असावा
- अर्जदारा कडे दिव्यांगत्वाचे UDID प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे
- अर्जदारदि.०१.०१.२०२४ या अहर्ता दिनांकाच्या दिवशी १८ ते ५५ या वयोगटातील असावा
- मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत त्यांचे कायदेशीर पालक अर्ज करण्यास सक्षम असतील
- दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्नरु. २.५० लाख पेक्षा अधिक नसावे
- लाभार्थी निवड करताना जास्त अपंगत्व असलेल्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे निवडीचा क्रमहा अतितीव्र दिव्यांगत्व ते कमी दिव्यांगत्व या क्रमाने राहील.
- अतितीव्र दिव्यांगत्व असणाऱ्या दिव्यांग व्यक्तीस वाहन चालविण्याचा परवाना नाकारला असल्यासअशा परिस्थितीत देखील परवाना धारक नसलेल्या अतितीव्र दिव्यांग व्यक्तीच्या बाबतीत सोबत्याच्या (Escort) सहाय्याने फिरता मोबाईल व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले जाईल
- अर्जाच्या वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधीत वाहनाची योग्यती काळजी घेण्याचे बंधपत्र सादर करणे आवश्यक राहील
- अर्जाचा वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधित वाहनाची योग्य ती काळजी घेण्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे.
- जिल्हानिहाय लाभार्थ्यांची घोषणा दिव्यांगांच्या संख्येच्या प्रमाणात केली जाईल
- अर्जदार हा शासकीय/निमशासकीय/मंडळे/महामंडळे यांचा कर्मचारी नसावा
- या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार जर दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचा कर्जदार असेल तरतो थकबाकीदार नसावा
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिये करिता आपण खालील दस्तऐवज तयार ठेवणे आवश्यक आहे
- अर्जदाराची सही
- जातीचा दाखला
- अधिवास प्रमाणपत्र
- निवासी पुरावा
- दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- ओळखपत्र
- बँक पासबुकचे पहिले पान
- अर्जदाराचे प्रतिज्ञापत्रक
- ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत खालील चरणांचा समावेश आहे
- सूचना वाचणे
- प्रथमच वापरकर्त्याची नोंदणी (साइन-अप )
- ऍप्लिकेशन पोर्टलवर लॉगिन (साइन-इन) करणे
- अर्ज भरणे आणि कागदपत्रे अपलोड करणे
- फॉर्मचे पुनरावलोकन करणे, घोषणा तपासणे आणि फॉर्म सबमिट करणे
- अर्ज ऑनलाईन सबमिशनची पोचपावती
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ योजना व्यवसायाचे प्रकार
- खादयपदार्थ-पाणीपुरी, दक्षिणात्य पदार्थ इडली, डोसा, वडा सांबर इत्यादी, फळांचे रस केंद्र, बेकरी उत्पादने, पाव भाजी, आईस्क्रिम/बर्फाचा गोळा इ.
- किरकोळ-किराणा भुसार, स्टेशनरी, पुजा साहित्य, बुट व बॅग्ज दुरुस्ती, साफसफाईची साधने विक्री, किरकोळ वस्तु भांडार, रद्दी भंगार वस्तु, वन उत्पादने, हातथैल्या व कपडे, फळांचे दुकान, भाजीपाल्यांचे दुकान, प्रसाधने इत्यादी.
- स्वतंत्र व्यवसाय- मोबईल दुरुस्ती, झेरॉक्स सेंटर, फिरते हेअर कटिंग सलून, विदयुत उपकरणे दुकान, घडयाळ दुरुस्ती इ.
- वाहतुक व्यवसाय-वाहतुक केंद्र, पर्यटनाकरीता वाहन पुरविणे
- इतर-एकाच वाहनावर एकापेक्षा जास्त नवीन प्रकारचे व्यवसाय करण्याच्या दृष्टीने सातत्याने विकासात्मक संशोधन करण्यात येईल.
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ योजनेच्या अटी व शर्ती
- लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
- लाभार्थ्याकडे दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान ४० टक्के असावे तसेच जिल्हा शल्य चिकित्सक
- सक्षम प्राधिकारी, यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र धारक असावा.
- लाभार्थी हा १८ ते ५५ या वयोगटातील असावा.
- मतिमंद लाभार्थ्यांच्या बाबतीत त्यांचे कायदेशीर पालक अर्ज करण्यास सक्षम असतील. अपंग लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाख पेक्षा अधिक नसावे.
- लाभार्थी निवड करताना जास्त अपंगत्व असलेल्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे निवडीचा क्रम हा अतितीव्र अपंगत्व ते कमी अपंगत्व या क्रमाने राहील.
- अतितीव्र अपंगत्व असणाऱ्या अपंग व्यक्तीस वाहन चालविण्याचा परवाना नाकारला असल्यास अशा परिस्थितीत देखील परवानाधारक नसलेल्या अतितीव्र अपंग व्यक्तीच्या बाबतीत सोबत्याच्या (Escort) सहाय्याने फिरता मोबाईल व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले जाईल.
- अर्जाच्या वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधीत वाहनाची योग्य ती काळजी घेण्याचे बंधपत्र सादर करणे आवश्यक राहील.
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ योजना आवश्यकतेनुसार अर्ज पात्रतेचे निकष
अपंग वित्त व विकास महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निश्चित करण्यात येतील व सदर निकषाच्या आधारे अर्ज पात्र अथवा अपात्र ठरविण्यात येतील, अर्ज पात्रतेचे निकष जाहिरातीमधून प्रसिध्द करण्यात येतील, पात्र अर्ज जिल्हा व्यवस्थापका मार्फत अपंग महामंडळाच्या मुख्यालयात सादर करण्यात येतील, नागपूर व अमरावती विभागाकरीता, विभागीय व्यवस्थापक, अपंग वित्त व विकास महामंडळ, विभाग नागपूर यांचे मार्फत पात्र अर्ज महामंडळाच्या मुख्यालयात सादर करण्यात येतील. संबंधित जिल्हयाचे जिल्हाव्यवस्थापक, अपंग वित्त व विकास महामंडळ अथवा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी नियुक्त केलेली स्वयंसेवी संस्था यामध्ये पात्र अपात्रतेचे निकष अंमलात आणून लाभार्थी निवड करतील. जिल्हानिहाय लाभार्थ्यांची घोषणा अपंगांच्या संख्येच्या प्रमाणात केली जाईल. योजनेनुसार लाभार्थ्याने निवड केलेल्या व्यवसायावर अत्याधुनिक संगणकीय प्रणालीव्दारे (Through Online System) नियंत्रण ठेवले जाईल. त्या अनुषंगाने GPRS, Software Monitoring, Live Tracking बाबतचा अहवाल सादर करणेस आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.
मित्रांनो ही माहिती तुम्ही नक्कीच जास्तीत जास्त इतरांना पाठवा जेणेकरून अपंग बांधवांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल.