WhatsApp Group Join Now

PM KISAN पीएम किसान FTO ON,केल्यानंतरच मिळणार पी एम किसानचा हप्ता;PM Kisan Registration FTO ON/OFF,FTO OFF, PM Kisan FTO Not Processed

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना काय आहे? What is Prime Minister Kisan Samman Nidhi Yojana?

किसान योजना पी.एम. किसान, शासनाच्या निर्देशांनुसार राज्यात फेब्रुवारी २०१९ पासुन पी. एम. किसान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना रु.२०००/- प्रती हप्ता याप्रमाणे समान ३ हप्त्यामध्ये रक्कम रु. ६०००/- वार्षीक लाभ देण्यात येतो. शेतकऱ्यांना निश्चित स्वरुपाचे उत्पन्न मिळावे तसेच शेतीच्या हंगामात खते, बियाणे, किटकनाशके इ. खरेदी करण्यासाठी आवश्यक पैशांची गरज भागवणे व त्याव्दारे कृषि उत्पादन वाढावे तसेच आर्थिक पाठबळ व्हावे हा या योजनेचा उद्देश आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाचा लाभ कोण घेऊ शकतो? Who can take benefit of Prime Minister Kisan Samman Nidhi Yojana?

योजनेमध्ये केंद्र व राज्य शासनाचे चतुर्थ श्रेणी / गट – ड वर्ग अधिकारी/कर्मचारी,शासन अंगीकृत संस्था, स्वायत्त संस्थेतील व स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी/कर्मचारी, मागील वर्षात आयकर भरलेल्या व्यक्ती, संवैधानिक पद धारण करणारी / केलेली आजी/माजी व्यक्ती तसेच आजी/माजी मंत्री, खासदार, आमदार, महापालीकेचे महापौर व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन रु.१०,०००/- किंवा त्यापेक्षा जास्त आहे. ( चतुर्थश्रेणी / गट – ड वर्ग कर्मचारी वगळून) त्याचप्रमाणे नोंदणीकृत व्यवसायीक जसे डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी लेखापाल (सी.ए.), वास्तुशास्त्रज्ञ ( आर्कीटेक्ट) इत्यादी क्षेत्रातील व्यक्ती वगळता इतर शेतकरी लाभार्थी म्हणून पात्र ठरतात.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना हप्ता वाटप कालावधी कोणता असतो? What is the weekly distribution period of Prime Minister Kisan Samman Nidhi Yojana?

दरवर्षी पी. एम. किसान योजनेच्या लाभाचा पहिला हप्ता हा माहे डिसेंबर ते माहे मार्च, दुसरा हप्ता हा माहे एप्रिल ते जुलै व तिसरा हप्ता हा माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर अशा प्रकारे देय असून निवड झालेल्या लाभार्थीच्या आधार संलग्न बँक खात्यात केंद्र शासनाकडून थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (DBT) निधी जमा करण्यात येतो. केंद्र शासनाच्या सुचनांनुसार लाभार्थीचे बँक खाते हे आधार संलग्न करण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार आधार संलग्न असलेल्या बँक खात्यावर लाभ जमा केला जात आहे.

पीएम किसान नवीन नोंदणी सोप्या पद्धतीने कसे करायचे? How to do PM Kisan new registration easily?

पीएम किसान नवीन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा. ? PM Kisan new registration Herehttps://pmkisan.gov.in/?

  • मित्रांनो पीएम किसान नवीन नोंदणी करून तुम्ही पीएम सम्मान निधी योजनाचे 2000 हजार रुपयेचा लाभ घेऊ शकता यासाठी तुम्हाला सर्व प्रक्रिया जाणून घ्यायची आहे.
  • नवीन नोंदणी साठी तुम्हाला या लिंकवर जावे लागेल.
  • येथे गेल्यानंतर तुम्हाला या प्रमाणे पेज उघडलेले दिसेल. यथे सर्वात आधी वरती दिलेल्या पर्यायावरून भाषा मराठी करून घ्यायचे आहे.
  • त्यानंतर नवीन नोंदणी New Farmer Regestration वर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर Rural Farmer Registration ग्रामीणसाठी व Urban Farmer Registration शहरी म्हणजे तुम्ही ज्या भागातील शेतकरी आहात तो भाग निवडा. (ग्रामीण किंवा शहरी)
  • त्यांनंतर आधार नंबर आधार ला लिंक असलेला मोबाईल नंबर टाकून महाराष्ट्र राज्य निवडा आणि त्या खालील दिसत असलेला कॅपचा त्या समोरील जागेत भरा.
  • ओटीपी पाठवण्यासाठी Get OTP या बटणावर क्लिक करा.
  • लक्षात घ्या ओटीपी पाठवण्यासाठी तुमच्या आधार लिंक नंबर हा नेटवर्क क्षेत्रात असावा व त्याला रिचार्ज असावा जेणेकरून त्या नंबरवर ओटीपी येईल.
  • आता तुमच्या समोर दिसत असलेला फॉर्म वर सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे.
  • जसे की, राज्य,जिल्हा,तालुका,ब्लॉक,गांव(तुमची जमीन असलेले महसूल गावाचे नाव निवडा)
  • त्यानंतर तुमच्या जातीचा प्रवर्ग निवडून खाली farmer type मध्ये जर तुम्हाला 5 एकर जमीन असेल म्हणजे 2 हेक्टर तर Small 1-2 Ha ही पर्याय निवडा.
  •  त्यांतर तुमचा मोबाईल नंबर Land Regestraton ID येथे तुमचा गटाच्या सातबारा वरील ULPIN समोरील क्रमांक टाका. व तुमचा रेशन कार्ड चा ऑनलाईन नंबर टाका.
  • त्यांतर पी एम किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी होय किंवा नाही करा.
  • त्यानंतर तुम्हाला जर तुमचे खाते स्माईक क्षेत्र असेल तर Joint निवडा जर नसेल तर singal निवडून गट नंबर,खाता नंबर,तुमचा नावावर असलेले क्षेत्र तुमच्या नावावर जमीन नोंद झाल्याची तारीख त्यांतर तुम्हाला जमीन विकत,वारसाने,दान किंवा जे कारण असेल ते टाकून तुम्ही वापरात घेतलेली तारीख ही सर्व माहिती भरून खालील बाटणावर जाऊन सेव्ह करा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा डिजिटल सातबारा किंवा 8 अ उतारा 100 kb च्या आतमध्ये आपलोड करून खालील बाटणावर सेव्ह करा. त्यानंतर तुम्हाला 1 संदेश येईल तो त्यामध्ये तुमचा नोंदणी क्रमांक असेल तो तुम्हाला जपून ठेवायचा आहे.

पीएम किसान नवीन नोंदणी केल्यानंतर पात्र होण्यासाठी किती कालावधी लागतो? How much time does it take to become eligible after PM Kisan new registration?

पी एम किसान योजना लाभ घेण्यासाठी तुम्ही नवीन नोंदणी केल्यानंतर शासनाच्या संबधित राज्य शासन व केंद्र शासन पी पीएम किसान विभाग यांच्याकडून या नोंदणीची सर्व स्तरावरून योग्य कार्यवाही व तपासणी होते त्यानंतर हे शासनाकडून मान्यता Approval मिळाल्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो.

पीएम किसान सम्मान निधी योजनेचे लाभार्थी स्थिति कसे पाहायचे? How to get beneficiary status under PM Kisan Samman Nidhi Yojana?

  • या पेजवर दिसत असलेल्या Know Your Status या बाटणावरती क्लिक करा.
  • त्यानंतर जर तुमच्या कडे तुमचं पी एम किसान सम्मान निधीचा नोंदणी क्रमांक असेल तर Enter Registration No. याखालील बॉक्स मध्ये नोंदणी क्रमांक टाकून पुढील बॉक्स मध्ये कॅपचा Capcha  टाकून Get OTP वरती क्लिक करा.
  • व त्यानंतर तुम्हाला लाभार्थी स्थिति पहावयास मिळेल.  

अशाप्रकारे तुम्हाला पीएम किसान सम्मान निधी योजनेची लाभार्थी स्थिति Beneficiary Status पहायला मिळेल.

पीएम किसान स्थिति पाहण्यासाठी येथे क्लिक करा. ? PM Kisan Benefiacry Status

पीएम किसान सम्मान निधी योजनेत लाभार्थी स्थिति मध्ये कोणत्या त्रुटी आढळून आल्यास काय कराल? What action will you take if you find any error in the beneficiary status of PM Kisan Samman Nidhi Yojana?

PERSONAL INFORMATION– यामध्ये तुमचे आधार कार्डवरील नाव,सातबारा वरील नाव व येथील दिसत असलेल्या नावाची तपासणी करून घेणे. चुकीचे असल्यास तुम्ही दुरुस्ती साठी Update Your Details येथे जाऊन करू शकता. मात्र यासाठी तुम्हाला केवायसी करणे गरजेचे आहे.  

ELIGIBILITY STATUS– येथे आल्यानंतर Land Seeding नो यापैकी 12 लाख शेतकरी पात्र असूनही भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत नसणे या कर्णनाने वंचित आहेत , तसेच काहींचे  ई-केवायसी नसणे तसेच बँक खात्याशी आधार संलग्न नसणे, असे याचे करणे या तीन कारणांनी वंचित राहिले आहेत.

पीएम किसान योजना मध्ये तुम्हाला आधी या योजनेचा हप्ता मिळत असे व त्यानंतर केवायसी करूनही हप्ता मिळत नाही तर काय करावे. In PM Kisan Yojana, you get half or half of the scheme’s week and after that you have to do KYC only if you don’t get a week or else do the work.

पी एम किसान योजनेचा केवायसी KYC करूनही जर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत नसेल तर त्यासाठी तुम्हाला खालील निकष व त्यासाठी पर्याय काय असेल हे आपण बघणार आहोत. जर तुम्ही लाभार्थी स्टेट्स बघितले तर त्यामध्ये LETEST INSTALLMENT DETAILS या FTO Processed-No दाखवत असल्यास काय करावे?

पीएम किसान सम्मान निधी लाभार्थी स्थिति मध्ये FTO म्हणजे काय? What does FTO mean in PM Kisan Samman Nidhi beneficiary status?

  • पीएम किसान सम्मान निधी लाभार्थी स्थिति मध्ये FTO जर No म्हणजे नाही दाखवत असेल. तर  शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. यासाठी तुमच्या लाभार्थी स्थितिमध्ये FTO हे Yes असणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
  • जर तुम्ही PM किसान पोर्टलवर तुमची स्थिती तपासत असाल, तर FTO जनरेट झाला आहे आणि पेमेंट कन्फर्मेशन प्रलंबित आहे, असा संदेश दिसत आहे, तर काळजी करू नका. तुमचा हप्ता लवकरच तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जाईल.
  • FTO चे पूर्ण रूप म्हणजे फंड ट्रान्सफर ऑर्डर. याचा अर्थ असा की “राज्य सरकारने लाभार्थीचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक आणि बँकेच्या IFSC कोडसह इतर तपशीलांची अचूकता सुनिश्चित केली आहे. तुमची हप्त्याची रक्कम तयार आहे आणि ती तुमच्या बँक खात्यावर पाठवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
  • FTO म्हणजे फंड ट्रान्सफर ऑर्डर आपल्याला माहिती आहे की, अनेक कारणांमुळे एक व्यक्ती पीएम किसान योजनेसाठी अपात्र ठरू शकतो. मात्र यासाठी तुम्हाला काही प्रक्रिया करावे लागेल.
  • PM किसान FTO प्रक्रिया केलेल्या समस्यांचे निराकरण | PM किसान FTO मध्ये नाही ऐवजी होय असणे महत्वाचे आहे.
  • बंधूंनो, अनेकांना प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत ₹2000 चा लाभ मिळाला नाही, त्यांची स्थिती योग्य होती, मात्र पी एम किसान योजनेचा हप्ता थांबण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांचे FTO प्रक्रिया झालेली नाही. तुम्हालाही पीएम किसान योजनेचा हप्ता घ्यायचा असेल, तर मी तुम्हाला पीएम किसान FTO समस्या सोडवण्याबद्दल तपशीलवार आम्ही सांगत आहे.
  • सर्वप्रथम, PM किसान annexer llll नंबरचा फॉर्म कसा डाउनलोड करायचा, त्याची लिंक सर्वात खाली दिलेली आहे जो पूर्वीचा पात्रता पडताळणी फॉर्म आहे.
  • तुम्हाला या लिंकवर क्लिक करून पीएम किसान परिशिष्ट lll चा ४ पानांचा PDF फॉर्म डाउनलोड करून प्रिंट केल्यानंतर, तुम्हाला आवश्यक कागदपत्रांसह फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल.
  • आणि फॉर्म भरल्यानंतर, तुम्हाला हा फॉर्म संलग्न कागदपत्रांसह तुमच्या जवळच्या पीएम किसान योजना कृषी विभागाच्या कार्यालयात जमा करावा लागेल.
  • तपासणी केल्यानंतर, संबंधित अधिकारी पीएम किसान एफटीओ प्रोसेस्ड हो करेल आणि त्यानंतर, तुमचे हप्ते येणे सुरू होईल.
  • अशा प्रकारे तुम्ही PM किसान FTO प्रक्रिया समस्या घरी बसून सोडवू शकता.

FTO प्रक्रिया मधील Rft चा अर्थ काय आहे? What does Rft mean in the FTO process?

जेव्हा तुम्ही PM किसान सन्मान निधी च्या वेबसाइटला भेट देऊन तुमची लाभार्थी स्थिती तपासता, तेव्हा तुम्हाला अनेक वेळा 1ल्या, 2ऱ्या, 3ऱ्या, 4व्यासाठी राज्याकडून स्वाक्षरी केलेले Rft मिळते. , 5 वा किंवा 6 वा हप्ता लिहिला जाईल. येथे Rft चा पूर्ण फॉर्म Request For Transfer असा आहे. याचा अर्थ ‘लाभार्थींचा डेटा राज्य सरकारने तपासला असून, तो बरोबर आढळला आहे.’ यानंतर, राज्य सरकार केंद्राला लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्याची विनंती करते.

पीएम किसान सम्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी KYC कार्यपध्दती KYC procedure to avail benefits of PM Kisan Samman Nidhi Yojana

  • eKYC प्रमाणिकरण करण्याची प्रक्रिया हि अत्यंत सोपी आहे. शेतकरी स्वतः आपल्या स्मार्टफोनचा वापर करून ही प्रक्रिया सुलभतेने करू शकतात. e-KYC प्रमाणिकरण प्रक्रिया करताना लाभार्थी शेतकरी यांनी आपला आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक eKYC प्रमाणिकरण करण्यासाठी तयार ठेवावा.
  • पीएम किसान सम्मान निधि योजना वेबसाइट वर जाऊन तुम्ही केवायसी KYC करू शकता.  
  • e-KYC प्रक्रिया प्रलंबित असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील नोंदणीकृत लाभार्थ्यांना e-KYC करण्यासाठी केंद्र शासनाने पी. एम. किसान पोर्टलवर तीन प्रकारे सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. १. मोबाईल OTP आधारीत २. सामायिक सुविधा केंद्र (CSC) मार्फत
  1. मोबाईल OTP आधारीत –
  2. स्वतःच्या आधार लिंक मोबाईल क्रमांकाच्या आधारे लाभार्थ्यांनी अँड्रॉइड मोबाईलमध्ये Google वर जाऊन pmkisan.gov.in या
  3. संकेतस्थळावरील Farmer Corner या टॅबखाली e-KYC नावाच्या पर्यायावर क्लिक करावे.
  4. त्यानंतर समोर दिसणाऱ्या बॉक्समध्ये आपला आधार क्रमांक प्रविष्ट करावा.
  5. त्यानंतर त्या समोरच्या बॉक्समध्ये स्वतःचा आधार लिंक केलेला मोबाईल क्रमांक प्रविष्ट करावा आणि Get OTP हा पर्याय निवडावा.
  6. यानंतर आपल्या आधार लिंक मोबाईल क्रमांकावर पी. एम. किसान कडून चार अंकी ओटीपी प्राप्त होईल.
  7. सदर ओटीपी समोरच्या ओटीपी बॉक्स मध्ये नमुद करावा.
  8. पुन्हा एकदा आधार ओटीपी साठी क्लिक करावे.
  9. त्यानंतर आपल्या आधार लिंक मोबाईल क्रमांकावर आधार ओटीपी प्राप्त होईल.
  10. OTP समोरच्या OTP बॉक्स मध्ये प्रविष्ट करून खाली दिसणाऱ्या Submit सबमिट बटनावर क्लिक करावे.
  11. त्यांनंतर आपल्या स्क्रीनवर e-KYC is successfully done असा मेसेज दिसेल म्हणजेच आपली e-KYC प्रमाणिकरण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.
  • सेतु सुविधा केंद्र (CSC) मार्फत
  • लाभार्थी शेतकऱ्यांनी स्वतःचे आधार कार्ड व मोबाईल फोन घेऊन सामायिक सुविधा केंद्र (CSC) सेंटरवर जावे.
  • आपल्या आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक यांचा वापर करून बायोमेट्रीक पद्धतीने e-KYC प्रमाणिकरण करावे.
  • सर्व लाभार्थ्यांनी मोबाईल OTP द्वारे किंवा सेतु सुविधा केंद्र (CSC) मार्फत e-KYC प्रमाणिकरण प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

पीएम किसान सम्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी KYC साठी येथे क्लिक करा.

आतापर्यंत योजनेचे एकुण 15 हप्ते वितरीत करण्यात आले आहेत. माहे नोव्हेंबेर 2023 15 वा हप्ता देय होत आहे. तथापी, केंद्र शासनाने हा हप्ता वितरीत करण्यापुर्वी लाभार्थीनी आपले e-KYC करणे बंधनकारक केलेले आहे. त्यामुळे पी. एम. किसान योजनेमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांनी आपली e-KYC प्रक्रिया पुर्ण झाली असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.

पीएम किसान सम्मान निधीच्या कोणत्याही समस्या लगेच सोडवण्यासाठी उपाय?

पी एम किसान सम्मान निधी योजनेचा हप्ता तुम्हाला मिळत नसेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर तुम्ही हप्ता न मिळत नसल्याचे समस्या जाणून घेऊ शकतो. ते अगदी 2 मिनिटांत

  • सर्वप्रथम सर्वात खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे.
  • त्यांनंतर शासनाच्या एका नविन पोर्टल किसान-eमित्र येथे आल्यानंतर तुम्हाला भाषा ही हिन्दी ठेवायची आहे.
  • यामध्ये तुम्हाला दिसत असलेल्या 4 प्रश्नपैकी 1 ला प्रश्नवर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला प्रिय लाभार्थी, आपका विवरण प्राप्त करने के लिए, मैं आपसे अनुरोध करता हूं कि आप अपना आधार संख्या या पीएम किसान पंजीकरण संख्या या मोबाइल संख्या दर्ज करें। असा संदेश दाखवला जाईल. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाकायचा आहे.
  • त्यानंतर तुम्हाला पडताळणी साठी एक OTP पाठवला जाईल तो ओटीपी टाकून ओके करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती दाखवली जाईल तुमचे नाव, पत्ता,नोंदणी क्रमांक, नोंदणी दिनांक आणि तुम्हाला किती हप्ते मिळालेले आहेत. जर तुमच्या नोंदणी मध्ये कोणत्याही त्रुटी आढळल्या तर तर तसे नमूद करून त्यावर पर्याय दाखवले जाईल.
  • अशा प्रकारे तुम्ही पी एम किसान सम्मान निधी योजनेचा हप्ता लाभ घेऊ शकता.

पीएम किसान सम्मान निधी समस्येच्या बाबतीत निवारणासाठी किसान-eमित्र संवाद करण्यासाठी येथे क्लिक करा.

FTO फॉर्म डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

पीएम किसान सम्मान निधी-PMKISAN NIDHI FAQ

Q.लहान आणि अल्पभूधारक शेतकरीसाठी पात्र आहेत का?

ज्या शेतकरी कुटुंबांकडे शेतीयोग्य जमीन आहे ते या योजनेच्या लाभांसाठी अर्ज करू शकतात.

Q.पीएम किसान सम्मान निधीसाठी वयोमर्यादा किती आहे?

Ans-18 वर्षे ते 40 वर्षे वयोगटातील शेतकरी या योजनेत सहभागी होण्यास पात्र आहेत. शेतकर्‍यांना रु.च्या दरम्यान रक्कम द्यावी लागेल. 55 ते रु. 60 वर्षे वयापर्यंत पोहोचेपर्यंत पेन्शन फंडात दरमहा 200 रु

Q.e-KYC प्रमाणिकरणासाठी लाभार्थ्याने एकदा वापरलेला मोबाईल क्रमांक हा पुन्हा दुसऱ्या लाभार्थ्यास e-KYC साठी वापरता येईल का?

Ans-e-KYC प्रमाणिकरणासाठी लाभार्थ्याने एकदा वापरलेला मोबाईल क्रमांक हा पुन्हा दुसऱ्या लाभार्थ्यास e-KYC साठी वापरता येत नाही.

Q.पीएम किसान नवीन नोंदणी केल्यानंतर लाभ मिळण्यासाठी किती दिवस लागू शकतात

Ans-पीएम किसान नवीन नोंदणी केल्यानंतर लाभ मिळणासाठी किती 2-6 महीने किंवा यापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो.     

शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल उपयुक्त ठरली असेल तर नक्कीच तुम्ही ही माहिती इतरांना पाठवा. कारण आम्ही ही उपयुक्त माहिती फक्त तुमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी 8 ते 10 दिवस वेळ घालवून वेगवेगळ्या स्त्रोतद्वारे समाविष्ट करून देत असतो.   

1 thought on “PM KISAN पीएम किसान FTO ON,केल्यानंतरच मिळणार पी एम किसानचा हप्ता;PM Kisan Registration FTO ON/OFF,FTO OFF, PM Kisan FTO Not Processed”

  1. माझ्या रजिस्ट्रेशन नंबर वरील पत्ता चुकीचा आहे पत्ता दुरुस्ती करण्यासाठी कोणता उपाय आहे

    Reply

Leave a Comment

You cannot copy content of this page