मित्रांनो आज आपण महाराष्ट्र योजना या वेबसाईटवर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या योजनेअंतर्गत ही योजना काय आहे,या योजनेचा उद्देश काय आहे,लाभार्थी पात्रता,कोणकोणत्या लाभ या योजनेचा समाविष्ट आहेत याबाबत माहिती बघणार आहोत.
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना योजनेचा उद्देश
शेतकऱ्यांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देणे.
समाविष्ट जिल्हे : टि. एस. पी. – ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, अहमदनगर, नांदेड, अमरावती, यवतमाळ, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली. या १६ जिल्ह्यात योजना राबविण्यात येते.
ओ.टि.एस.पी.- ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या २९ जिल्ह्यात योजना राबविण्यात येते.
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना लाभार्थी निवडीचे निकष
- शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक राहील.
- नवीन विहिरीचा लाभ घ्यावयाचा असल्यास शेतकऱ्याकडे त्याच्या स्वतःचे नावे किमान ०.४० हेक्टर व नवीन विहीर खोदणे ही बाब वगळून योजनेतील अन्य बाबींसाठी किमान ०.२० हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्याच्या नावे जमीनधारणेचा ७/१२ दाखला व ८ अ उतारा असणे आवश्यक आहे. ( नगर पंचायत, नगरपालिका व महानगर पालिका क्षेत्राबाहेरील )
- लाभार्थ्यांचे स्वतःचे बँक खाते असणे व सदर बँक खाते आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे.
- अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्याचे सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न रु.१,५०,०००/- पेक्षा जास्त नसावे.
- ज्या शेतकऱ्यांचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न रुपये १,५०,०००/- च्या मर्यादेत आहे, अशा शेतकऱ्यांनी संबंधित तहसीलदार यांचेकडून मागील वर्षाचा उत्पन्नाचा अद्ययावत.
- दाखला घेणे व अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहील.
- लाभार्थीस योजनेंतर्गत लाभ देण्यासाठी ग्रामसभेची शिफारस आवश्यक आहे.
- लाभार्थ्याकडे जर काही घटक उपलब्ध असतील तर उर्वरित आवश्यक घटकांचा लाभ विहित मर्यादेत देण्यात येईल.उपरोक्त घटकांचा लाभ घेतल्यानंतरही लाभार्थ्यांने इनवेल
- बोअरींग व परसबाग या घटकांची मागणी केल्यास सदर घटकांचा अतिरिक्त लाभ देण्यात येईल.
- सोलरपंपासाठी अनुदान जर शेतकऱ्यास महावितरण कंपनीकडून सोलरपंप मंजूर झाला असेल तर पंपसंच व वीज जोडणीसाठी अनुज्ञेय अनुदानाच्या मर्यादेत (रु. ३०,००० /- ) लाभार्थी हिस्स्याची रक्कम महावितरण कंपनीस अदा करता येईल.
- योजनेची अंमलबजावणी क्षेत्रीय स्तरावर सदर योजनेची अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून करण्यात येते.
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना नवीन विहीर अनुदान:
नवीन विहीर, वीज जोडणी आकार, तुषार किंवा ठिबक, पंप संच, एचडीपीई / पीव्हीसी पाईप्स असे एकूण रु. ३.३५ ते ३.६० लाख.
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना जुनी विहीर दुरुस्ती अनुदान-
जुनी विहीर दुरुस्ती, वीज जोडणी आकार, तुषार किंवा ठिबक, पंप संच, एचडीपीई / पीव्हीसी पाईप्स असे एकूण रु. १.३५ ते १.६० लाख.
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण अनुदान-
शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण, वीज जोडणी आकार, तुषार किंवा ठिबक, पंप संच, एचडीपीई/पीव्हीसी पाईप्स असे एकूण रु. १.८५ ते २.१० लाख.
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना घटक अंमलबजावणी
१) नवीन विहीर –
नवीन विहीर या घटकाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याने यापूर्वी केंद्र / राज्य / जिल्हा परिषद अथवा इतर कोणत्याही शासकीय योजनेतून नवीन सिंचन विहिरीचा लाभ घेतलेला नसावा. तसेच, यापूर्वी शासकीय योजनेतून घेतलेल्या व अर्धवट राहिलेल्या अपूर्ण विहिरीचे काम करण्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही. लाभार्थ्याच्या ७/१२ वर तसेच शेतात प्रत्यक्ष विहीर असल्यास या घटकाचा लाभ घेता येणार नाही. नवीन विहीर घ्यावयाच्या स्थळापासून ५०० फुटाचे अंतरामध्ये दुसरी विहीर नसावी. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडे वरिष्ठ भूवैज्ञानिक यांच्याकडील पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.
२) जुनी विहीर दुरुस्ती :
जुनी विहीर दुरुस्ती या घटकाचा लाभ घेणाऱ्या अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांच्या ७/१२ वर विहिरीची नोंद असावी. विहीर दुरुस्तीच्या कामास उच्चतम अनुदान मर्यादेपेक्षा ( रु. ५०,०००/-) अधिक रक्कम लागल्यास लाभार्थीने स्वतः उभी करावयाची आहे. ३) इनवेल बोअरींग : नवीन विहीर / जुनी विहीर दुरुस्ती या घटकाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याने इनवेल बोअरींगची मागणी केल्यास रु.२०,०००/- च्या मर्यादेत अनुदान अनुज्ञेय राहील. इनवेल बोअरींगचे काम करताना खर्चाचे अंदाजपत्रक व तांत्रिक निकषानुसार ठिकाणाची योग्यता (Feasibility Report) भूजल सर्वेक्षण यंत्रणेकडून प्राप्त करून घ्यावा.
४) वीज जोडणी आकार :
नवीन विहीर पॅकेज / जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज / शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण पॅकेजमधील तथा आवश्यकतेनुसार केवळ वीजजोडणी मागणी करणाऱ्या लाभार्थ्याने विद्युत वितरण कंपनीकडे कोटेशन भरल्याची पावती सादर केल्यानंतर खातरजमा करून लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरद्वारे विहित अनुदान मर्यादेत अनुदान वर्ग करण्यात येईल.
५) शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण :
ज्या शेतकऱ्यास ग्रामविकास व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या व बिरसा
मुंडा कृषी क्रांती योजना ( क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) योजनेचे पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्याने शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण या घटकाची मागणी केल्यास, राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या मार्गदर्शक सूचना व आर्थिक मापदंडानुसार प्रत्यक्ष खर्च किंवा रु.१,००,०००/- यापेक्षा जी रक्कम कमी असेल त्या मर्यादेत अनुदान अनुज्ञेय राहील.
६) सूक्ष्म सिंचन संच : बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील ) या योजनेतून सूक्ष्म सिंचन या बाबीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना प्रथमतः प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना- प्रति थेंब अधिक पीक योजनेमधून लाभ घेणे अपेक्षीत असून या योजनेमधून फक्त Top up साठी अनुदान देण्यात येईल.
७) पंपसंच ( डिझेल /विद्युत) : पंपसंचाच्या लाभासाठी निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना पंपसंच खरेदीकरिता कृषी अधिकारी (विघयो), पंचायत समिती यांनी पूर्वसंमती घ्यावी. सदर लाभार्थ्यांनी एक महिन्याच्या कालावधीत पंपसंचाची खरेदी करणे आवश्यक राहील अन्यथा संबंधित शेतकऱ्यांची पूर्वसंमती रद्द करण्यात येईल. केंद्र व राज्य शासनाच्या अधिकृत सक्षम संस्थांनी पंपसंचाचे रीतसर तपासणी (testing) करून ते BIS अथवा अन्य सक्षम संस्थांनी निश्चित केलेल्या मानकानुसार (standards) असल्याचे प्रमाणित केले असेल त्याच पंपसंचाची पूर्वसंमती प्राप्त लाभार्थी शेतकऱ्याने खरेदी करावयाची आहे.
८) पाईप (पीव्हीसी / एचडीपीई) : सिंचनासाठी मान्यताप्राप्त प्रकाराच्या आय.एस.आय. मार्क पाइपची लाभार्थ्यांनी पूर्वसंमतीने त्यांच्या पसंतीनुसार खरेदी करावी. लाभार्थ्याकडे सिंचनासाठी स्रोत उपलब्ध असल्याची खात्री करून पाइपच्या किमतीच्या १०० टक्के किंवा उच्चतम रु. ३०००० /- च्या मर्यादेत अनुदान अनुज्ञेय राहील.
९) परसबाग : आदिवासी शेतकऱ्यांना कुटुंबासाठी लागणारा भाजीपाला त्यांचे घराभोवतीच पिकविणे शक्य आहे. यासाठी शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाला उदा. भेंडी, गवार, चवळी, दुधी भोपळा, डांगर भोपळा, शेवगा, काकडी, दोडका इ. बियाणांचे कीट लाभार्थ्यांनी महाबीज / एनएससी इत्यादी बियाणे उत्पादक कंपनीच्या अधिकृत परवानाधारक विक्रेत्याकडून खरेदी करण्यासाठी जास्तीत जास्त रु.५००/- पर्यंत लाभ देता येईल.
या योजनेसाठी महा डीबीटी पोर्टलचे संकेतस्थळावर शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज कसा करायचा याबाबत माहितीसाठी येथे क्लिक करा.
जर तुम्हाला पी पीएम किसान निधी दोन हजार च्या हपत्याबाबत कोणत्याही समस्या येत असल्या तर खालील लिंक वर क्लिक करून सोडवा.
- पीएम किसान नवीन नोंदणी केल्यानंतर पात्र होण्यासाठी किती कालावधी लागतो?
- पीएम किसान सम्मान निधी योजनेचे लाभार्थी स्थिति कसे पाहायचे?
- पीएम किसान सम्मान निधी योजनेत लाभार्थी स्थिति मध्ये कोणत्या त्रुटी आढळून आल्यास काय कराल?
- पीएम किसान सम्मान निधी लाभार्थी स्थिति मध्ये FTO म्हणजे काय?
- पीएम किसान सम्मान निधी लाभार्थी स्थिति मध्ये FTO प्रक्रिया मधील Rft चा अर्थ काय आहे?
- पीएम किसान सम्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी KYC कशी कराल?