WhatsApp Group Join Now

फळपीक विमा योजना ऑनलाईन अर्ज सुरु| संरक्षित विमा,अटी व नियम पहा संपूर्ण माहिती |असा करा अर्ज

पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक पीक विमा योजना २०२३ -२४

१) समाविष्ट फळपिके- मृग बहार संत्रा, मोसंबी, लिंबू, डाळिंब, पेरु, सिताफळ, चिकू व द्राक्ष (एकुण – ८)

२)आंबिया बहार- द्राक्ष, डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, आंबा,काजू, स्ट्रॉबेरी (प्रायोगीक तत्वावर) व पपई या ( एकुण ९ ) फळपिकासाठी महसूल मंडळ हा घटक धरून राज्यात राबविण्यात येत आहे.

फळपिक पीक विमा योजनेची उद्दिष्टे

नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळ पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. पिकांच्या नूकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.

फळपिक पीक विमा लाभार्थी निवडीचे निकष

  • सदरची योजना ही अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसुचित फळपिकांसाठी असेल.
  • सन २०२०-२१ पासून पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी ऐच्छिक आहे.
  • अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित फळपिकांसाठी खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.
  • जास्तीत जास्त शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता यावा यासाठी जमीन भूधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यास अधिसुचित फळपिकासाठी ४ हे. क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे.
  • राज्यातील अधिसुचित फळपिकाखालील एकूण २० हे. व त्यापेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या अधिसुचित महसूल मंडळात योजना राबविण्यात येते.
  • अधिसुचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच

फळपिक पीक विमा आर्थिक मापदंड

  • या योजनेतंर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार केंद्र शासनाने त्यांचा विमा हप्ता ३० टक्के दरापर्यंत मर्यादित केला आहे. त्यामुळे ३० टक्के वरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी स्विकारणे क्रमप्राप्त आहे.
  • या योजनेंतर्गत ३० ते ३५ टक्के पर्यंतचे अतिरिक्त ५ टक्के विमा हप्ता दायित्व राज्य शासनाने स्विकारले असून ३५ टक्के वरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी प्रत्येकी ५०:५० टक्के प्रमाणे भरावयाचा आहे.

फळपिक पीक विमा सहभागी जिल्हे व विमा कंपन्या

ही योजना सन २०२१-२२, २०२२-२३ व २०२३ – २४ मध्ये खालील ३ विमा कंपन्यांमार्फत राज्यात राबविण्यात येत आहे.

अ.क्र.जिल्हे  विमा कंपनीचे नांव व पत्ता
वाशिम, यवतमाळ, धुळे, पालघर, सोलापुर, नागपूर, अहमदनगर, अमरावती, नाशिक,सिंधुदूर्ग, रत्नागिरी, नंदूरबार (१२)  रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. ग्राहक सेवा क्र. : १८००१०२४०८८ – दूरध्वनी क्र. ०२२-६८६२३००५. ई-मेल: rgicl. maharashtraagrirelianceada.com    
बीड, छ. संभाजीनगर, अकोला, सांगली, वर्धा, ठाणे, हिंगोली, सातारा, परभणी, जालना, लातुर, कोल्हापूर. (१२)  एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि. ग्राहक सेवा क्र. : १८००२६६०७००, दूरध्वनी क्र. ०२२-६२३४६२३४ | ई-मेल: pmfby.maharashtrahdfcergo.com  
रायगड, बुलढाणा, भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड जळगाव, नांदेड, पुणे, धाराशीव (६)भारतीय कृषि विमा कंपनी,लिमिटेड टोल फ्री क्र. : १८००४१९५००४, दूरध्वनी क्र. ०२२-६१७१०९१२ ई-मेल: pikvimaaicofindia.com  

फळपिक पीक विमा विमा सहभागाची अंतिम मुदत

मृग बहार सन २०२३ मध्ये फळपिक निहाय योजनेमध्ये शेतकऱ्यांनी (कर्जदार व बिगर कर्जदार ) योजनेतील सहभागाचा अर्ज सादर करणे, विमा हप्त्याची रक्कम कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामधून प्राथमिक सहकारी संस्था / बँक / आपले सरकार सेवा केंद्र / विमा प्रतिनिधी यांनी कपात करणे / शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक

या योजनेतंर्गत राज्य शासनाने महावेध प्रकल्पातंर्गत कार्यान्वित केलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रावर नोंदविल्या गेलेल्या हवामानाची आकडेवारी व फळपिकनिहाय निश्चित करण्यात आलेले हवामान धोके यांची सांगड घालून शेतकऱ्यांना संबंधित विमा कंपनीमार्फत नुकसान भरपाई अदा करण्यात येते.

शेतकऱ्यांनी अधिसुचित फळपिकांच्या हवामान धोक्यांची तसेच त्यांना भरावयाच्या विमा हप्त्याची माहिती करुन घेऊन विहित मुदतीमध्ये नजीकच्या ई-सेवा केंद्र किंवा बँक / वित्तीय संस्था यांच्याशी संपर्क साधून सहभाग नोंदवावा. हंगामनिहाय अधिसुचित फळपिकांचे हवामान पुढीलप्रमाणे आहे.

फळपिक पीक विमा योजनेची अंमलबजावणी – समाविष्ट फळपिकांच्या जोखमीच्या बाबी

अधिसूचित महसूल मंडळातील अधिसूचित फळपिकांकरिता, पाऊस (जास्त, कमी, अवेळी व पावसाचा खंड), आर्द्रता, तापमान ( कमी व जास्त), वेगाचा वारा व गारपीट हे हवामान धोके निश्चित करण्यात आले आहेत.

धोके, विमा संरक्षित रक्कम, विमा संरक्षण कालावधी, विमा हप्ता इत्यादी बाबत सविस्तर माहितीसाठी,शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी सहभागी विमा कंपन्यांना,सबंधित विमा कंपनीचे जिल्हा / तालुका कार्यालय किंवा कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.किंवा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तसेच ई सेवा केंद्र व बँक स्तरावरही फॉर्म भरणे चालू आहे.

मृग बहार (२०२१, २०२२ व २०२३) फळपिक निहाय हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी

अ.क्र.फळ पिकेसमाविष्ट धोकेविमा संरक्षण कालावधीविमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर
संत्रा  १) कमी पाऊस २)पावसाचा खंड  १५ जून ते १५ जुलै १६ जुलै ते १५ ऑगस्ट  ८०,०००  
मोसंबी  १)कमी पाऊस २)पावसाचा खंड  ०१ जुलै ते ३१ जुलै ०१ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट  ८०,०००  
पेरु  कमी पाऊसपावसाचा ३) खंड व जास्त तापमान  १५ जून ते १४ जुलै १५ जुलै ते १५ ऑगस्ट  ६०,०००  
चिकूजादा आर्द्रता व जास्त पाऊस  ०१ जुलै ते ३० सप्टेंबर  ६०,०००  
डाळिंब  पाऊसाचा खंडजास्त पाऊस    १५ जुलै ते १५ ऑक्टोबर १६ ऑक्टो. ते ३१ डिसेंबर  १,३०,०००  
लिंबू  १) कमी पाऊस २) पावसाचा खंड  १५ जून-१५ जुलै १६ जुलै -१५ ऑगस्ट  ९०,०००  
सिताफळ  १) पाऊसाचा खंड २) जास्त पाऊस  ०१ ऑगस्ट-३० सप्टेंबर ०१ ऑक्टोबर-३० नोव्हेंबर५५,०००  
द्राक्ष-(क)पाऊस, आर्द्रता व किमान तापमान  १५ जून ते १५ नोव्हेंबर  ३,२०,०००  

आंबिया बहार २०२३-२४ मध्ये फळपिक निहाय हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी

अ.क्र.  फळपिकेसमाविष्ट धोके  विमा संरक्षण कालावधीविमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर
संत्रा  १) अवेळी पाऊस २) कमी तपामान ३) जादा तापमान ४) गारपीट  ०१ डिसेंबर ते १५ जानेवारी १६ जानेवारी ते २८ फेब्रुवारी ०१ मार्च ते ३१ मे  ८०,०००
मोसंबी  १) अवेळी पाऊस २) जास्त तापमान ३) जास्त पाऊस ४) गारपीट  ०१ जानेवारी ते ३० एप्रिल ०१ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर ०१ मार्च ते ३१ मार्च १५८०,०००  
 मोसंबी  ऑगस्ट ते १५ सप्टेंबर०१ जानेवारी ते ३० एप्रिल२६, ६६७
डाळिंब  १) अवेळी पाऊस २) जादा तापमान ३) जास्त पाऊस  १५ जानेवारी ते ३१मे ०१ एप्रिल ते ३१ मे ०१ जून ते ३१ जुलै  9,30,000  
  ४) गारपीट  ०१ जानेवारी ते ३० एप्रिल४३,३३३
काजू  १) अवेळी पाऊस २) कमी तापमान ३) गारपीट  ०१ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी ०१ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी  १०००००  
  ४) गारपीट  ०१ जानेवारी-३० एप्रिल३३,३३३
केळी  १) कमी तापमान २) वेगाचा वारा ३) जादा तापमान    १ नोव्हेंबेर-२८ फेब्रुवारी १० मार्च-३१ जूलै १ एप्रिल-३१ मे १,४०,०००
  ३) गारपीट१ जानेवारी-३० एप्रिल ४६,६६७
द्राक्ष  १) अवेळी पाऊस २) दैनंदिन कमी तापमान१६ ऑक्टोबर-३० एप्रिल ०१ डिसेंबर-८ फेब्रुवारी  ३,२०,०००
  ३) गारपीट  ०१ जानेवारी ते ३१ मे१,०६,६६७  
आंबा (कोकण)  १) अवेळी पाऊस २) कमी तापमान ३) जास्त तापमान ३) जादा तापमान  ०१ डिसेंबर ते-मे ०१ जानेवारी-१० मार्च १ मार्च-१५ मे १६ एप्रिल-१५ मे  १,४०,०००
  ४) गारपीट  १ फेब्रुवारी-३१ मे  ४६,६६७
आंबा (इतर जिल्हे )  १) अवेळी पाऊस २) कमी तापमान ३) जास्त तापमान ३) जादा तापमान  १ जानेवारी-३१ मे १ जानेवारी-२८ फेब्रुवारी १ मार्च-३१ मार्च १ एप्रिल-३१ मे  १,४०,०००
  ४) गारपीट  ०१ फेब्रुवारी-३१ मे  ४६,६६७
स्ट्रॉबेरी  १) अवेळी पाऊस व सापेक्ष आर्द्रता २) अवेळी पाऊस, सापेक्ष आर्द्रता व जास्त तापमान ३) कमी तापमान१५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर ०१ फेब्रुवारी ते ३० एप्रिल ०१ डिसेंबर-३१ मार्च  २,००,०००
  ४) गारपीट  ०१ जानेवारी-३० एप्रिल६६, ६६७
१०पपई१) कमी तापमान २) वेगाचा वारा ३) जास्त पाऊस व आर्द्रता  ०१ नोव्हेंबर-२८ फेब्रुवारी ०१ फेब्रुवारी-३० जून १५ जून ते ३० सप्टेंबर३५,०००
  ४) गारपीट०१ जानेवारी-३० एप्रिल  ११, ६६७  

Leave a Comment

You cannot copy content of this page