WhatsApp Group Join Now

Pm Kisan New Registration Prosses|पी एम किसान योजना नवीन नोंदणी सुरू|असा करा मोबाईलद्वारे सोप्या पद्धतीने अर्ज 2024

पीएम किसान नवीन नोंदणी सोप्या पद्धतीने कसे करायचे? How to do PM Kisan new registration easily?

  • मित्रांनो पीएम किसान नवीन नोंदणी करून तुम्ही पीएम सम्मान निधी योजनाचे 2000 हजार रुपयेचा लाभ घेऊ शकता यासाठी तुम्हाला सर्व प्रक्रिया जाणून घ्यायची आहे.
  • नवीन नोंदणी साठी तुम्हाला खालील शासनाच्या आधिकृत वेबसाईटच्या लिंकवर जावे लागेल.
  • येथे गेल्यानंतर तुम्हाला या प्रमाणे पेज उघडलेले दिसेल. यथे सर्वात आधी वरती दिलेल्या पर्यायावरून भाषा मराठी करून घ्यायचे आहे.
  • ही प्रक्रिया तुम्ही मोबाईलवरून करत असाल तर त्याआधी तुम्हाला गुगल क्रोम Google Chorme मध्ये ही वेबसाईट उघडल्यानंतर उजव्या बाजूला दिसत असलेल्या तीन डॉट वर क्लिक करून डेस्कटॉप मोड Desktop Mode समोरील चौकोनवर क्लिक करा.
  • त्यानंतर नवीन नोंदणी New Farmer Regestration वर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर Rural Farmer Registration ग्रामीणसाठी व Urban Farmer Registration शहरी म्हणजे तुम्ही ज्या भागातील शेतकरी आहात तो भाग निवडा. (ग्रामीण किंवा शहरी)
  • त्यांनंतर आधार नंबर आधार ला लिंक असलेला मोबाईल नंबर टाकून महाराष्ट्र राज्य निवडा आणि त्या खालील दिसत असलेला कॅपचा त्या समोरील जागेत भरा.
  • ओटीपी पाठवण्यासाठी Get OTP या बटणावर क्लिक करा.
  • लक्षात घ्या ओटीपी पाठवण्यासाठी तुमच्या आधार लिंक नंबर हा नेटवर्क क्षेत्रात असावा व त्याला रिचार्ज असावा जेणेकरून त्या नंबरवर ओटीपी येईल.
  • आता तुमच्या समोर दिसत असलेला फॉर्म वर सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे.
  • जसे की, राज्य,जिल्हा,तालुका,ब्लॉक,गांव(तुमची जमीन असलेले महसूल गावाचे नाव निवडा)
  • त्यानंतर तुमच्या जातीचा प्रवर्ग निवडून खाली farmer type मध्ये जर तुम्हाला 5 एकर जमीन असेल म्हणजे 2 हेक्टर तर Small 1-2 Ha ही पर्याय निवडा.
  • त्यांतर तुमचा मोबाईल नंबर Land Regestraton ID येथे तुमचा गटाच्या सातबारा वरील ULPIN समोरील क्रमांक टाका. व तुमचा रेशन कार्ड चा ऑनलाईन नंबर टाका.
  • त्यांतर पी एम किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी होय किंवा नाही करा.
  • त्यानंतर तुम्हाला जर तुमचे खाते स्माईक क्षेत्र असेल तर Joint निवडा जर नसेल तर singal निवडून गट नंबर,खाता नंबर,तुमचा नावावर असलेले क्षेत्र तुमच्या नावावर जमीन नोंद झाल्याची तारीख त्यांतर तुम्हाला जमीन विकत,वारसाने,दान किंवा जे कारण असेल ते टाकून तुम्ही वापरात घेतलेली तारीख ही सर्व माहिती भरून खालील बाटणावर जाऊन सेव्ह करा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा डिजिटल सातबारा किंवा 8 अ उतारा 100 kb च्या आतमध्ये आपलोड करून खालील बाटणावर सेव्ह करा. त्यानंतर तुम्हाला 1 संदेश येईल तो त्यामध्ये तुमचा नोंदणी क्रमांक असेल तो तुम्हाला जपून ठेवायचा आहे.
  • पीएम किसान नवीन नोंदणी केल्यानंतर पात्र होण्यासाठी किती कालावधी लागतो? How much time does it take to become eligible after PM Kisan new registration?
  • पी एम किसान योजना लाभ घेण्यासाठी तुम्ही नवीन नोंदणी केल्यानंतर शासनाच्या संबधित राज्य शासन व केंद्र शासन पी पीएम किसान विभाग यांच्याकडून या नोंदणीची सर्व स्तरावरून योग्य कार्यवाही व तपासणी होते त्यानंतर हे शासनाकडून मान्यता Approval मिळाल्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो.
  • पीएम किसान नवीन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.

पी एम किसान योजना नवीन नोंदणी कसे करायचे त्यासाठी खालील सविस्तर हा व्हिडिओ पहा.

पीएम किसान सम्मान निधी योजनेचे लाभार्थी स्थिति कसे पाहायचे? How to get beneficiary status under PM Kisan Samman Nidhi Yojana?

  • या पेजवर दिसत असलेल्या Know Your Status या बाटणावरती क्लिक करा.
  • त्यानंतर जर तुमच्या कडे तुमचं पी एम किसान सम्मान निधीचा नोंदणी क्रमांक असेल तर Enter Registration No. याखालील बॉक्स मध्ये नोंदणी क्रमांक टाकून पुढील बॉक्स मध्ये कॅपचा Capcha  टाकून Get OTP वरती क्लिक करा.
  • व त्यानंतर तुम्हाला लाभार्थी स्थिति पहावयास मिळेल.  
  • अशाप्रकारे तुम्हाला पीएम किसान सम्मान निधी योजनेची लाभार्थी स्थिति Beneficiary Status पहायला मिळेल.

पीएम किसान स्थिति पाहण्यासाठी येथे क्लिक करा. ? PM Kisan Benefiacry Statu

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाचा लाभ कोण घेऊ शकतो? Who can take benefit of Prime Minister Kisan Samman Nidhi Yojana?

  • योजनेमध्ये केंद्र व राज्य शासनाचे चतुर्थ श्रेणी / गट – ड वर्ग अधिकारी/कर्मचारी,शासन अंगीकृत संस्था, स्वायत्त संस्थेतील व स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी/कर्मचारी, मागील वर्षात आयकर भरलेल्या व्यक्ती, संवैधानिक पद धारण करणारी / केलेली आजी/माजी व्यक्ती तसेच आजी/माजी मंत्री, खासदार, आमदार, महापालीकेचे महापौर व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन रु.१०,०००/- किंवा त्यापेक्षा जास्त आहे. ( चतुर्थश्रेणी / गट – ड वर्ग कर्मचारी वगळून) त्याचप्रमाणे नोंदणीकृत व्यवसायीक जसे डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी लेखापाल (सी.ए.), वास्तुशास्त्रज्ञ ( आर्कीटेक्ट) इत्यादी क्षेत्रातील व्यक्ती वगळता इतर शेतकरी लाभार्थी म्हणून पात्र ठरतात.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाच्या कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

You cannot copy content of this page