WhatsApp Group Join Now

भारतात पहिली बससेवा कुठे व कधी सुरु झाली?

मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की आपल्या भारत देशात विज्ञानाने खूप उंच भरारी घेतली आहे . त्यामुळे आजच्या युगात आपल्याला लहान मुले हट्ट करायला लागल्यास त्यांना आजही आपण महागड्या सायकली घेऊन देतो. मात्र एक वेळ अशी होती की, त्यावेळी साधे लहान मुलांना तर सोडा ज्येष्ठ माणसांनाही वाहतूक किंवा मौजमजा करण्यासाठी सायकली किंवा गाड्या मिळाल्या नाहीत. मात्र आता विज्ञानाच्या भरारीमुळे सगळ्याच गोष्टी साध्य होत आहेत.तसेच सध्या आपल्याकडे दळणवळणाची अनेक साधने आहेत, त्यात मोटार वाहनांचे बस हे प्रमुख साधन आहे. देशभरातून दररोज कोट्यवधी प्रवासी बसने प्रवास करतात. मात्र भारतात जेव्हा कोणतीच दळणवळणाची साधने नव्हती व जेव्हा भारतात पहिल्यांदा बस आली तेव्हा भारतात एकच उत्साहाचे प्रतीक उमटले होते तथापि, भारतातील पहिली बस कुठे आणि केव्हा धावली हे तुम्हाला माहिती आहे का? नसल्यास, आपण या लेखाद्वारे याबद्दल जाणून घेऊ शकता.

भारतात पहिली बस मुंबईमध्ये धावली कारण मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई असल्याने तसेच मुंबई ही स्वतःची परिवहन सेवा आहे, ज्या अंतर्गत राज्य बस वाहतूक व्यवस्था चालविली जाते. मात्र, भारतात पहिल्यांदा बस कधी आणि कुठे धावली हे तुम्हाला माहिती आहे का? नसल्यास, या लेखाद्वारे आपण भारतातील पहिली बस आणि तिची जागा जाणून घेणार आहोत.

भारतात पहिली बस कधी धावली?

भारतातील  पहिली बस सेवा ही देशात पहिल्यांदा १५ जुलै १९२६ रोजी धावली. देशात पहिल्यांदाच बस सेवा सुरू करण्यात आली. देशातील पहिली बस सेवा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरात म्हणजेच देशाची आर्थिक राजधानी येथे सुरू करण्यात आली. जेव्हा मुंबईमध्ये बसची सुविधा चालू करण्यात आली त्यावेळी मुंबईमध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले .

पहिली बस सेवा कुठून कुठे गेली?

भारतातील पहिली बस सेवा ही अफगाण चर्च म्हणजेच कुलाबा येथून क्रॉफर्ड मार्केट म्हणजेच सध्याच्या ज्योतिबा फुले मार्केटपर्यंत  सर्वप्रथम  चालली. मात्र त्याकाळी या बसचे भाडे चार आणे असायचे असे सांगितले जाते.

त्यानंतर भारतात 1937 मध्ये डबल डेकर बस धावू लागली?

भारतात डबल डेकर बसेसची सुविधा व प्रथा स्वातंत्र्यापूर्वी 1937 मध्ये भारतात सुरू झाली. याच वेळी बसेसमध्ये प्रवाशांची गर्दी वाढू लागली होती, त्या पार्श्वभूमीवर डबल डेकर बसची संकल्पना मांडण्यात आली. आणि यामध्ये बसच्या छतावर प्रवाशांसाठी बसण्याची व्यवस्थाही वाढवून करण्यात आली होती.

भारतात पहिली बससेवा कोणी चालवली?

भारतात पहिली बससेवा चालवणारी संस्था मुंबईची बेस्ट संस्था होती, जी बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग (BEST) म्हणून नावाने ओळखली जाते. BEST हे मुंबई महापालिकेचे स्वतंत्र युनिट आहे. या युनिटने त्यावेळी मुंबईत पॉवर प्लांट स्थापन केला होता, त्यानंतर मुंबईत पहिली बससेवा सुरू झाली आणि आजही ही बससेवा सुरू आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page