WhatsApp Group Join Now

ग्रामसेवक,तलाठी, शासकीय अधिकारी तुमचे काम करत नसेल तर अशी करा ऑनलाईन व ऑफलाईन तक्रार|लगेच होईल काम |Gramsevak,Talathi,Sarpanch Online Complaint

सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व इतर शासकीय अधिकारी असे करतात सामान्य जनतेची आर्थिक लूट 

मित्रांनो आजकाल आपण बघतो की सर्वांनाच छोट्याशा वैयक्तिक कागदोपत्री कामासाठी सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व इतर शासकीय कर्मचारी यांच्याकडून अति प्रमाणात त्रास दिले जाते. तुमची सर्व कागदपत्रे बरोबर असतानाही किंवा तुम्ही सर्व कागदपत्रे व्यवस्थितरित्या मुदतीत जोडले असतानाही ग्रामसेवक किंवा तलाठी हे सामान्य नागरिकां कडून पैसे घेण्यासाठी किंवा मुद्दाम कामात दिरंगाई करताना आढळले जातात. यामुळे मात्र सामान्य नागरिकांना अतिशय जास्त प्रमाणात मानसिक, आर्थिक आणि वेळेचा त्रासही सहन करावा लागतो. ग्रामीण भागातील अशिक्षित नागरिकांना ग्रामसेवक आणि तलाठी पैसे घेऊन लुटण्याचे काम करतात. तलाठी किंवा ग्रामसेवक यांची तक्रार तुम्ही त्यांच्या वरिष्ठाजवळ केल्यास त्यांच्यावरील वरिष्ठ अधिकारी व ग्रामसेवक किंवा तलाठी यांच्या तुम्ही तक्रारही केल्या तरी या तक्रारी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्तरावर संगणमत करून सरपंच ग्रामसेवक आणि तलाठी हे तक्रारी तेथेच दाबून ठेवतात. तसेच तलाठी यांच्याकडे शेतकऱ्यांचे काही काम असल्यास तलाठी अधिकारी हे तलाठी सजा त्यांच्या पद्धतीने संबंधित गावात न ठेवता दुसरीकडे कार्यालय उघडून बसतात. त्याचप्रमाणे तलाठी हे त्यांची कामकाज बघण्यासाठी गावातील गोर गरिबांना लुटारू माणसं ठेवतात. आता तुम्हाला तलाठी कडे काही काम असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीला भेटावे लागते. त्यानंतर तो व्यक्ती तलाठी व त्याचे कमिशनाचे गणित करून शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन तलाठी व तो व्यक्ती पैसे आपापसात वाटून घेतात. अशा प्रकारे शेतकऱ्यांची ग्रामसेवक व तलाठी यांच्याकडून पैसे लुटण्याचे काम चालू असते. ही सत्य परिस्थिती प्रत्येक गावात प्रत्येक शेतकऱ्यांसोबत घडलेलीच असेल. 

खरे पाहता सरपंचाला गावकऱ्यांनी गावाच्या विकासासाठी निवडून दिलेले असते. मात्र काही सरपंच हे त्यांचाच विकास करण्यामध्ये शासनाकडून आलेला निधी चा गैरवापर करतात. त्याचप्रमाणे सरपंचाला गावातील निधी स्वतःच्या विकासासाठी वापरण्याचा कोणताही अधिकार नाही. अशाच प्रकारे तलाठी किंवा ग्रामसेवक यांना शासनाकडून पगार असतानाही गोरगरिबांकडून पैसे लुटण्याचे काम चालूच असते. तलाठी व ग्रामसेवक तसेच इतर अधिकारी यांना अपेक्षेपेक्षा जास्त पगार असूनही शेतकरी व सामान्य गोरगरिबांकडून पैसे उकळण्याचे काम करत असतात. शेतकरी मित्र तसेच सामान्य वर्गांसाठी हा अन्याय कुठेतरी थांबायलाच पाहिजे. अशावेळी तुम्ही काय करणार हे आम्ही आजच्या लेखामध्ये तुम्हाला सांगणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा आणि  मित्र व नातेवाईकांनाही नक्की पाठवा.

शासकीय कर्मचारी किंवा अधिकारी यांच्या तक्रारी करण्याचे विविध मार्ग

  • कोणताही शासकीय कर्मचारी किंवा अधिकारी तुमच्याकडून पैसे मागत असेल तर सर्वप्रथम तुम्ही पैसे मागत असलेल्या पुराव्यासहित वरील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकतात.
  • जर तुमच्याकडे कोणताही शासकीय अधिकारी तुमच्याकडून लाच मागत असेल तर तुम्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे तक्रार करू शकता. ही प्रक्रिया सर्व गुप्त पद्धतीने होत असते.
  • जर तुमच्याकडे वरिष्ठ अधिकारी पैसे मागत असल्यास बाबत काही पुरावा असल्यास तुम्ही थेट तुमच्या मंत्रालयात जाऊन तक्रार करू शकता. मात्र मंत्रालयात तक्रार करण्यात आली जेव्हा वरिष्ठांकडेही तुम्ही तक्रार करूनही त्यांनी संगमत केल्यास अशावेळी तुम्ही तुमच्या मंत्रालयात जाऊन तक्रार करू शकतात.
  • जर तुमच्याकडे एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा लाच मागत असल्याबाबतचा लिखित पुरावा असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे तक्रार करू शकता.
  • जर तुमच्याकडे एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याने लाच मागत असल्याबाबतचा लिखित पुरावा असेल तर तुम्ही तो लिखित पुरावा त्याबरोबर तक्रार अर्ज जोडून तुम्ही संबंधित मंत्रालयाच्या पोस्टद्वारे पाठवू शकता. मात्र ही तक्रार तुम्ही तक्रार करीत असलेल्या वरिष्ठांचे संगणक झाल्यास अशावेळी तुम्ही तक्रार करू शकता.
  • महाराष्ट्र शासन तर्फे आलेल्या वर्ग अ च्या अधिकाऱ्यांची लेखी तक्रार संबंधित विभागाच्या सचिवांकडे किंवा संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारींकडे करता येते.
  • या तक्रारीत अधिकाऱ्यांच्या वर्तनाची, त्यांच्याकडून झालेल्या भ्रष्टाचाराची किंवा अन्य चुकीची माहिती देणे आवश्यक आहे. तक्रारीत तक्रारदाराचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक आणि तक्रारीचे स्वरूप स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे.

ऑनलाइन तक्रार कशी नोंदवायची?

तुमची कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार असल्यास पुढील प्रक्रियेचा अवलंब करा.

सरकारी अधिकाऱ्यांबद्दल तक्रार करण्यासाठी, महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

  • तुम्ही https://grievances.maharashtra.gov.in/mr किंवा लिंकवर क्लिक करून अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
  • तुम्ही नवीन व्यक्ती असाल तर तुम्हाला तुमची सर्व माहिती भरून लॉगिन आयडी तयार करावा लागेल आणि त्यानुसार पासवर्डही तयार करावा लागेल.
  • सर्वप्रथम, तुमचा ई-मेल आयडी किंवा मोबाईल नंबर वापरून लॉगिन करा.
  • पासवर्ड टाकून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला विविध पर्याय उपलब्ध होतील.
  • तुमच्या समोर ‘विवाद नोंदणीकृत’ असा समानार्थी शब्द दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचे नाव, वडिलांचे नाव, नाव, जन्मतारीख, पत्ता, लिंग, व्यवसाय, राज्य, शहर, जिल्हा, तालुका, पिन कोड, मोबाईल नंबर, ईमेल आयडी भरा.
  • त्यानंतर तुम्हाला तक्रारीचा तपशील द्यावा लागेल.
  • येथे पुन्हा तुम्हाला जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचे आहे.
  • यानंतर, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या कर्मचाऱ्याविरुद्ध तक्रार करणार आहात, त्या विभागाची निवड करणे, त्यानंतर तुम्हाला कार्यालय आणि तक्रारीचे स्वरूप निवडायचे आहे.
  • त्यानंतर तुमची इतर माहिती भरून तक्रार दाखल करायची आहे.
  • तुम्ही केलेल्या तक्राराची स्थिती तुमच्या तक्रार क्रमांकावरून तुम्ही पाहू शकता.

अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या तक्रार चे निवारण करण्यासाठी वरीलपैकी कोणत्याही मार्गाचा वापर करू शकता.

Leave a Comment

You cannot copy content of this page