राज्यात विविध ठिकाणी मान्सून पोषक हवामान असून १० ते १४ जून पर्यंत संपूर्ण राज्याला मान्सून पावसाने व्यापणार असल्याची माहिती पंजाबराव डक यांनी दिली आहे.
maharashtra mansoon news-शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी आतुरता लाभलेली असते ती म्हणजे पाऊस. राज्यात विविध ठिकाणी मान्सून पावसाचे आगमन झाले आहे. मान्सूनचे दृश्य छत्रपती संभाजी नगर रत्नागिरी सोलापूर सांगली सिंधुदुर्ग कोल्हापूर यासह विविध भागात पाहायला मिळाले आहे. तसेच उर्वरित भागात येत्या 14 जूनच्या तारखेपर्यंत संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाचे दृश्य पहायला मिळणार आहे. या पुढील चार दिवसात ठिकठिकाणी मेगर्जना सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस येणार असल्याची माहिती हवामान अभ्यासात पंजाबराव डक यांनी दिली आहे.
यावर्षी मान्सूनचे आगमन मागील वर्षापेक्षा आधी झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मान्सून लवकरच देशातील आंध्र प्रदेश कर्नाटक छत्तीसगड ओडिसा बंगालचा उपसागर तसेच तेलंगाना या ठिकाणी पुरेसा पाऊस होण्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे दोन ते तीन दिवसात मुंबई पुणे सह इतर भागात मानसून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. मात्र आता पावसाने सर्वत्र राज्यभर हजेरी लावल्याने राज्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. राज्यात विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी करायला सुरुवात केली आहे.
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र तसेच कोकण या भागात 10 जून पर्यंत सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पावसाचा यलो Yellow अलर्ट देण्यात आला होता. तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. त्यामुळे येथे अतिवृष्टी मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान अभ्यासात पंजाबराव डक यांनी दिला आहे.