शेतकरी मित्रांनो कृषी विषयक सर्व योजना आधुनिक कृषी तंत्राच्या वापरासाठी शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आवश्यकता सर्व यंत्राचा योग्य वापर व्हावा या दृष्टीने कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना शेती आधारित यंत्र अनुदानातून देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना उपलब्ध यंत्राचा परिपूर्ण वापर करून अधिकाधिक आर्थिक फायदा व्हावा तसेच व्यापारक्षम शेतीची कास धरावी. याकरिता शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने विविध योजना राबविण्याचे काम करीत आहे. शेतकऱ्यांना उत्पादनात वाढ व्हावी व त्यातूनच जास्तीत जास्त आर्थिक बचत व्हावी या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना विविध कृषी यंत्राचे लॉटरी पद्धतीने वाटप करण्यात येते.
शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त लवकरात लवकर लाभ घेता यावा यासाठी कृषी विभागांनी ऑफलाइन पद्धतिने अर्ज प्रक्रिया बंद करून ऑनलाईन पद्धतीने आज प्रक्रिया चालू केले आहे. त्यामुळे आता कृषी विभागातील कोणत्याही अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी एकाच पोर्टल द्वारे ऑनलाईन अर्ज करून लाभ घेता येते. शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी शेतकरी योजना हे पोर्टल कृषी विभाग महाराष्ट्र शासनाने तयार केले आहे. या पोर्टलवरून शेतकरी ऑनलाइन अर्ज करू शकता किंवा प्ले स्टोर वरून महाडीबीटीMahadbt App ॲप डाऊनलोड करून याद्वारे शेतकरी अर्ज करू शकतात.
टोकन पेरणी यंत्र उद्देश
महाडीबीटी या शासनाच्या अधिकृत पोर्टलवरून योजना एक लाभ अनेक याप्रमाणे कृषी यांत्रिकीकरणाअंतर्गत दोन हेक्टर पर्यंत लाभार्थी असलेले शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येते. ज्या ठिकाणी शेतीमधील ऊर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये व अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषी यांत्रिकीकरणाचा तिला पोहोचवणे. शेतकऱ्यांना मनुष्यबळ त्याचा वापर उलट व जास्तीत जास्त व्हावा यासाठी जागरूक करणे. कृषी यंत्र किंवा अवजारे यांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देणे तसेच प्रशिक्षण व प्रात्यक्षिका द्वारे सहभागी शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन करणे.
या योजनेतून खालील दिलेल्या कृषि यंत्र / अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येते.
- ट्रॅक्टर
- पॉवर टिलर
- ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे
- बैल चलित यंत्र/अवजारे
- मनुष्य चलित यंत्र/अवजारे (टोकन-पेरणी यंत्र)
- प्रक्रिया संच
- काढणी पश्च्यात तंत्रज्ञान
- फलोत्पादन यंत्र/अवजारे
- वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
टोकन पेरणी यंत्रासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- ७/१२ उतारा
- ८ अ दाखला
- खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
- जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )
- स्वयं घोषणापत्र
- पूर्वसंमती पत्र
टोकन पेरणी यंत्रासाठी पात्रता
- शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे
- शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा
- शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक
- फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार
- कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक
- एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल
- उदा. एखाद्या शेतकऱ्याला सन २०१८-१९ मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील १० वर्षे ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही सन २०१९-२० मध्ये इतर औजारासाठी लाभापात्र राहील
Mahadbt ऑनलाइन अर्ज कसा करावा?
सर्वप्रथम तुम्हाला महाडीबीटी mahadbt.gov.in या शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा महाडीबीटी या शासनाच्या मोबाईल ॲपवर जायचे आहे.
- येथे आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला नवीन नोंदणीवर क्लिक करायचे आहे.
- नवीन नोंदणी करण्यासाठी तुम्हाला वापरकर्त्याचे नाव मध्ये तुमचे नाव, वापरकर्त्याचे आयडी मध्ये तुमचा आधार नंबर आणि नवीन पासवर्ड तुम्हाला बनवायच आहे.
- जर तुम्ही या आधी नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला लॉगिन या बटनावर क्लिक करायचे आहे.
- लॉगिन बटनावर क्लिक केल्यानंतर अर्ज करा या बटनावर क्लिक करा.
- त्यानंतर कृषी यांत्रिकीकरण समोरील बाबी निवडा या बटणावर क्लिक करा.
- त्यानंतर मुख्य घटक निवडा तापसणी मध्ये मनुष्य चलीत अवजारे निवडा यंत्रसामग्री मध्ये टोकन यंत्र व मशीनचा प्रकार तोपर्यंत निवडून आले दिलेल्या बॉक्स वर क्लिक करा आणि जतन करा या बटणावरती क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला लॉटरी लागल्याचे संदेश मार्फत कळवले जाईल.
Beti aur Mandi de rahe hain mujhe nahin mila hai mujhe bhi chahie