सर्वच शेतकरी मित्रांना आतुरता असते ती म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या मिळणाऱ्या दोन हजार रुपये हप्त्याची. त्यामुळे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा निधी शेतकऱ्यांना 18 जून रोजी जमा होणार आहे. त्यामुळे आता पी एम किसान सन्मान निधीचा १७ निधी शेतकऱ्यांच्या थेट NPCI प्रणाली द्वारे बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. मात्र पी एम किसान चा लाभ घेण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांना काही गुंतागुंतीच्या अडचणीमुळे खात्यावर निधी जमा होत नसल्याचे स्पष्ट झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर काही त्रुटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
पीएम किसान योजना,नमो शेतकरी योजना,महाडीबीटी अंतर्गत येणाऱ्या सर्व योजनेचे अनुदान आता तुम्हाला फक्त एकाच बँकेत खाते उघडून घेता येऊ शकते.डीबीटीला प्रणालीच्या माध्यमातून तुमच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात तुमचे पैसे तुम्हाला पैसे दिले जातात.तुमच्या बँक खात्यामध्ये सर्व योजनांचे पैसे डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच तुमचा आधार कार्डच्या माध्यमातून घेता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला पोस्ट बँकच्या खात्यात सर्व योजनेचे पैसे कसे घ्यायचे? त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल याबाबत आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये सर्व योजनांचे अनुदान घेण्यासाठी या बँकेत खाते असणे आवश्यक आहे. जर तुमचे या बँकेत खाते नसेल तर तुम्ही सर्वप्रथम इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये जाऊन निशुल्क अगदी दोन मिनिटात आपले खाते उघडू शकता. खाते उघडल्यानंतर तुम्हाला एटीएम कार्डासारखे कार्ड दिले जाते. हे खाते उघडल्यानंतर तुम्हाला तुमच्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत शासकीय अनुदानाचा लाभ घेता येईल.
बऱ्याच शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ बँकेच्या काही त्रुटीमुळे मिळत नाही. त्यामुळे तुमचे खाते इतर बँकेत असेल तर तुम्ही सर्वप्रथम पोस्ट बँकेत खाते उघडणे आवश्यक आहे.पोस्ट मध्ये खाते उघडून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकता. पोस्ट बँकेत खाते उघडताना तुम्हाला शासकीय अनुदानाचा लाभ घेण्यासाठी NPCI (National Payments Corporation of India (NPCI) – Enabling digital payments in India.) ला तुमचे आधार कार्ड DBT (Direct Benefit Transfer) सिस्टम द्वारे लिंक करून तुम्ही तुमच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ किंवा इतर शासकीय योजनेचा लाभ घेऊ शकता.
तुमची खाते इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचे असल्यास NPCI ला DBT लिंक करणे आवश्यक
जर तुमचे खाते इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत आधीपासून खाते उघडलेले असेल आणि तुम्हाला शासकीय योजनेचा लाभ या खात्यामध्ये जमा होत नसेल तर तुम्हाला NPCI ला DBT लिंक करणे आवश्यक आहे. लिंक करण्यासाठी खालील क्रमांचा वापर करा.
- सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे मोबाईल नेट बँकिंग चे ॲप डाऊनलोड करणे आवश्यक आहे.
- हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर OPEN या बटनावर क्लिक करायचे आहे त्यानंतर मागत असलेल्या अनुमतीलसाठी ALLOW या बटनावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमचे खाते नंबर, कस्टमर आयडी, जन्मतारीख व मोबाईल नंबर टाकून Register नोंदणी या बटणावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमच्या बँक तपशीलच्या सुरक्षेसाठी चार अंकी पिन तुम्हाला तयार करायचे आहे. हा चार अंकी M-Pin पिन तुम्हाला लक्षात किंवा लिहून ठेवायचे आहे.
- त्यानंतर पिन तयार केल्यानंतर पुन्हा एप्लीकेशन उघडून तुम्ही बनवलेला चार अंकी पिन क्रमांक येथे टाकायचा आहे.
- IPPB चे एप्लीकेशन उघडल्यानंतर My Services यामध्ये Services या बटणावरती क्लिक करायचे आहे.Services मध्ये आल्यानंतर चौथ्या क्रमांकाचे Aadhar Sedding आधार सीडींग या बटणावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर CHANGE DBT MAPPING TO IIBP ACCOUNT या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी प्राप्त होईल तो ओटीपी येथे टाकून सबमिट करायचे आहे.
- त्यानंतर डीबीटी प्रणालीला लिंक असलेले पूर्वीचे खाते येथे दाखवली जाईल. IIBP खाते लिंक करण्यासाठी CONFORM या बटणावरती क्लिक करा.
- त्यानंतर पुष्ठी करण्यासाठी पुन्हा आलेला OTP ओटीपी टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमच्या DBT MAPPING TO IIBP ACCOUNT आधार सीडिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या खात्यात पुढील शासकीय अनुदानाचा लाभ जमा होईल.