WhatsApp Group Join Now

पिक नुकसान भरपाईसाठी मोबाईलद्वारे असा करा दावा |crop insurance online apply

PRADHAN MANTRI PIK VIMA YOJNA:प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०१६ पासून राज्यात राबविण्यात येत आहे. Profit & Loss Sharing Model यापैकी एका मॉडेलनुसार योजनेची अंमलबजावणी करणेकरीता मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३ ते रब्बी हंगाम २०२५-२६ हंगामासाठी तीन वर्षांकरीता राज्यात राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना Cup & Cap Model नुसार खरीप २०२३ ते रब्बी २०२५-२६ हंगामासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक (Area Approach) धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यानुसार विमा कंपन्यांची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून ३ वर्षांसाठी निवड करण्यात आलेली आहे.

PMFBY – प्रधानमंत्री पीक विमा योजनेची उद्दीष्टये

  • नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतक-यांना विमा संरक्षण देणे.
  • पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतक-यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.
  • शेतक-यांना नाविन्यपूर्ण व सुधारीत मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे.
  • कृषि क्षेत्रासाठीच्या पत पुरवठयात सातत्य राखणे, जेणेकरुन उत्पादनातील जोखमींपासून शेतक-यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा, पिकांचे विविधीकरण आणि कृषि क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हे हेतू साध्य होण्यास मदत होईल.

PMFBY – प्रधानमंत्री पीक विमा योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

  • सदरची योजना ही या आदेशान्वये अधिसूचित केलेल्या पिकांसाठी केवळ अधिसूचित क्षेत्रासाठी लागू असेल. २) प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.
  • अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. मात्र भाडेपट्टीने शेती करणारास नोंदणीकृत (रजिस्टर्ड) भाडेकरार पिक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधानकारक आहे.
  • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी २ टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी ५ टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे. तथापि सन २०२३-२४ पासून सर्वसमावेशक पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय संदर्भ क्र. ६ अन्वये घेण्यात आलेला असून शेतक-यांना प्रती अर्ज केवळ १/- रुपया भरून पिक विमा पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे. या योजनेअंतर्गत निश्चित करण्यात आलेला पिकनिहाय प्रति हेक्टरी विमा हप्ता दर व शेतक-यांनी प्रत्यक्षात भरावयाचा विमा हप्ता रक्कम रू.१/- वजा जाता उर्वरीत फरक हा सर्वसाधारण विमा हप्ता अनुदान (Rate of normal premium subsidy) समजून राज्य शासनामार्फत अदा करण्यात येईल .
  • या योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२३ ते रब्बी हंगाम २०२५-२६ या तीन वर्षांकरिता सर्व अधिसूचित पिकांसाठी जोखिमस्तर ७० टक्के असा निश्चित करण्यात आला आहे.
  • अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उंबरठा उत्पादन हे मागील ७ वर्षापैकी सर्वाधिक उत्पादनाच्या ५ वर्षांचे सरासरी उत्पादन गुणीले त्या पिकाचा जोखिमस्तर विचारात घेवून निश्चित केले जाईल. उंबरठा उत्पादन हे तीन वर्ष कालावधीकरिता निश्चित असेल तसेच विमा कंपनीने सादर केलेला विमा हप्ता दरही या तीन वर्ष कालावधी करिता कायम असेल.
  • सदरची योजना ही एकूण १२ जिल्हा समुहासाठी निवडलेल्या पिक विमा कंपन्यांमार्फत तीन वर्षाकरीता राबविण्यात येईल. विमा कंपन्या एका वर्षामध्ये जिल्हा समुहामध्ये एकूण जमा विमा हप्ता रक्कमेच्या ११० टक्के पर्यंतचे दायित्व स्वीकारतील. तथापि, एका वर्षातील देय पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम, जमा विमा हप्ता रक्कमेच्या ११० टक्के पेक्षा जास्त असल्यास ११० टक्के पेक्षा जास्तीचा भार राज्य शासन स्विकारेल आणि जर देय पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम जिल्हा समुहामध्ये एकूण जमा विमा हप्ता रकमेपेक्षा कमी असेल तर विमा कंपनी विमा हप्ता रक्कमेच्या जास्तीत जास्त २० टक्के रक्कम स्वत:कडे ठेवेल व उर्वरीत विमा हप्ता रक्कम राज्य शासनाला परत करेल.
  • या योजनेत मृत शेतकऱ्यांच्या नावे विमा काढला गेल्यास तो प्रस्ताव रद्द करण्यात येईल.

PMFBY विम्याची मर्यादा काय आहे?

कर्जदार आणि बिगर समानदार कर्जदारासाठी प्रति हेक्टर विम्यास जिल्हा न्यायाधिकरणाने निश्चित केले आहे आणि SLCCCI समान असेल आणि SLCCCI द्वारे पूर्व-घोषित केली जाईल आणि अधिसूचित केली जाईल. वित्त स्केलची इतर गणना लागू होणार नाही. वैयक्तिक अहवालासाठी विम्याची चौकशी ही प्रस्तावना विम्याने केलेल्या अधिष्ठाता निवडीच्या क्षेत्रफळाने गुणांनी केलेले प्रति हेक्टर वित्त स्केलच्या बरोबरची आहे. ‘शेती खाली क्षेत्र’ नेहमी ‘हेक्टर’ मध्ये व्यक्त केले जावे. 2. सिंचित आणि भेसळ नसलेल्या क्षेत्रासाठी विम्याची सुरक्षा असू शकते

PMFBY अंतर्गत शासनाने ठरवून दिलेल्या किती पीक विमा कंपन्या आहेत?

  • रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
  • एचडीएफसी ईआरजीओ जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
  • चोलामंडलम जनरल इन्शुरन्स कंपनी
  • इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
  • युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी
  • बजाज अलियान्झ
  • फ्युचर जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.
  • ICICI Lombard General Insurance Co. Ltd.
  • टाटा आयजी जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
  • एसबीआय जनरल इन्शुरन्स
  • युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.

PMFBY अंतर्गत पिकांचे खालील प्रमाणे नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत कळवा विमा कंपनीला  

  • उत्पन्नाचे नुकसान (स्थायी पिके, अधिसूचित क्षेत्राचा आधार) यामध्ये

१. नैसर्गिक आग आणि वीज

२. वादळ, गारपी, चक्रीवादळ टायफून, टेम्पेस्ट, गैर-प्रतिबंधित जोखमीं होणारे उत्पन्न नुकसान भरून काढण्यासाठी सर्वसमावेशक जोखीम प्रदान केला. चक्रीवादळ, चक्रीवादळ इ.

३.पूर, पूरस्खलन

४. भूव. कोरडे पडणे कीटक/रोग

५. पेरणी (अधिसूचित आधारावर):- पेरणी/लागवड करण्यापासून प्रतिबंधित प्रकरणांमध्ये , विम्याचे भाग 1.3 च्या कमाल 25% पर्यंत नुकसानभरपाईसाठी पात्र असेल. कापणीचे नुकसान (वैयक्तिक नंतर शेतीचा आधार): चक्रीवादळ / चक्रीवादाच्या विशिष्ट संकटाविरुद्ध, कापणी नंतर शेतात सुकविण्यासाठी “कट अँड स्प्रेड” स्थिती ठेवण्यासाठी पिकासाठी निश्चितीपेक्षा जास्त 14 दिवसांपर्यंत कव्हर आहे. जानेवारीत पाऊस, अवकाळी पाऊस. १.४. स्थानिक आपत्तीवैयक्तिक शेतीचा आधार: ओळखल्या गेलेल्या स्थानिक जोखमीच्या स्थापनेमुळे नुकसान/नुकसान जसे की गारपीट भूस्खलन आणि पूरस्थिती अधिसूचित कृषी क्षेत्राला प्रभावित करते. 2. अपयुद्ध वर्जन: खालील धोक्याचे अस्तित्व बनवणारे धोके आणि नुकसान वगळले जातील:- आणि धोके धोके, आण्विक, डंगली, दुर्भावनापूर्ण नुकसान, शत्रुत्वाची प्रतिमा, पाळीव आणि/किंवा वन्य सैनिकी चरणे आणि/कंवा करणे, कापणी नंतर नुकसान करणे, कापणी करणे. पीक मळणी एका ठिकाणी बांधलेले आणि ढिग केले, पूर्वी इतरांना येण्याजोगे धोके.

अ.क्र.  पिके  शेतकरी हिस्सा विमा हप्ता
  खरीप हंगामरब्बी हंगाम
१.अन्नधान्य व गळीत धान्य पिके  विमा संरक्षीत रक्कमेच्या २ टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जे कमी असेल ते.  विमा संरक्षीत रक्कमेच्या १.५ टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जे कमी असेल ते.  
 नगदी पिके व कांदा) (कापुस  विमा संरक्षीत रक्कमेच्या ५ टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जे कमी असेल ते.  विमा संरक्षीत रक्कमेच्या ५ टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जे कमी असेल ते.  

PIK VIMA पिक विमाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा करण्याची पध्दत

  • विमा कंपन्यांनी त्यांना प्राप्त झालेला शेतकरी विमा हप्ता आणि शासनाकडुन प्राप्त अग्रिम विमा हप्ता (पहिला हप्ता) या रकमेतून प्रतिकूल हवामानामुळे पेरणी/ लावणी होऊ न शकणे / हंगामाच्या मध्ये प्रतिकूल परिस्थिती/स्थानिक आपत्तीच्या दाव्यांची पुर्तता अंतिम विमा हप्ता (दुसरा हप्ता) अदा होण्याची वाट न बघता करणे आवश्यक आहे.
  • विमा कायद्याचे कलम ६४ बी नुसार बाधीत विमा क्षेत्रासाठी प्राप्त विमा हप्ता शेतकरी हिस्सा आणि राज्य शासनाने अदा केलेला अग्रिम विमा हप्ता (पहिला हप्ता ) या निधीचा वापर करुन विमा कंपनीने सदर प्रकरणांतील नुकसान भरपाई अदा करणे बंधनकारक आहे.उत्पादनाच्या आकडेवारीवर आधारीत आणि काढणीपश्चात नुकसानीचे दावे शासनाकडुन विमा अनुदानाचा दुसरा हप्ता प्राप्त झाल्यावर करणे आवश्यक आहे.
  • विमा नोंदणीच्या अंतिम मुदतीनंतर १५ दिवसांत पोर्टलवरील अर्जांना मंजूरी मिळताच प्राप्त होणा-या अंतरिम विमा सहभागाच्या आकडेवारीच्या आधारे शासनाने सदर दुसरा हप्ता वितरीत करणे आवश्यक आहे. उर्वरित विमा हप्ता हंगामातील विमा नोंदणीच्या आकडेवारीची पुर्ण पडताळणी झाल्यावर, लागू असल्यास शासनाने अदा करावयाचा आहे.
  • हंगामाच्या शेवटी नुकसानभरपाई निश्चित करण्याच्या तरतुदीमध्ये राज्य शासनाकडून विहित वेळापत्रकानुसार उत्पादनाची आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर बँक / विमा प्रतिनिधी यांचे कडून प्राप्त झालेल्या विमा प्रस्तावानुसार अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांची नुकसान भरपाई विमा कंपनीच्या सक्षम प्राधिकाऱ्याकडून निश्चित करण्यात येईल.
  • एकापेक्षा जास्त जोखीम परीस्थिती अंतर्गत नुकसान भरपाई अदा करताना स्थानिक नैसर्गिक आपत्ती, मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती आणि काढणी पश्चात नुकसान यामध्ये नुकसान भरपाई अदा करण्याच्या प्रत्येक जोखीम बाबीची देय रक्कम एकूण विमा संरक्षित रकमेमधून अनुक्रमे कमी केली जाईल (Reduced sum insured). त्यामुळे अंतिम उत्पादनावर आधारित नुकसान भरपाई निश्चित करताना एकूण विमा संरक्षित शिल्लक रकमेवर नुकसान भरपाई परिगणना करण्यात येईल.
  • जर शेतकऱ्यांनी बँक / सी एस सी केंद्रामार्फत / विमा प्रतिनिधींच्या मार्फत विमा योजनेत सहभाग घेतला असेल तर नुकसान भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा कंपनीमार्फत जमा करण्यात येईल व त्याबाबत त्यांना सुचित करण्यात येईल तसेच अशा शेतकऱ्यांची माहिती ही विमा संकेतस्थळावर प्रसिध्द करणे आवश्यक राहील.
  • हवामान घटकाच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पेरणी / लावणी न झाल्यास होणारे नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान किंवा काढणी पश्चात होणारे नुकसान या बाबीअंतर्गत निश्चित होणारी नुकसान भरपाई सुध्दा वर नमुद केल्याप्रमाणेच शेतकऱ्यांना अदा करण्यात येईल.
  • विमा योजनेत सहभागी शेतकरी व इतर भागधारकांच्या तक्रारींचे निवारण विमा कंपनीने विनाविलंब करणे आवश्यक राहील.
  • उत्पादकता चुकीची नोंदवली आहे किंवा इतर कारणास्तव आक्षेपातील विमा नुकसान भरपाईचे दाव्यांच्या बाबतीत नुकसान भरपाई अदा केल्यापासून १ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी नंतर राज्य शासन कोणत्याही परिस्थितीत पुनर्गणना करू शकणार नाही किंवा विमा दावे प्रकरणे पुनः विचारार्थ पाठवू शकणार नाही.
  • या कालावधीनंतर प्राप्त होणारे दावे राज्यस्तरीय समन्वय समिती / राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती कडे पाठवून तदनंतर कृषि, सहकार व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार च्या अखत्यारितील तांत्रिक सल्लागार समितीकडे विचारार्थ व निर्णयार्थ पाठविण्यात येतील.
  • केंद्र शासनाकडील संदर्भ क्रं.४ अन्वये प्राप्त निर्देशानुसार प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत अधिसूचित पिकाच्या उत्पादनाची आकडेवारी, उंबरठा उत्पादन आकडेवारी, सहभागी शेतक-यांची नाव नोंदणी, व नुकसान भरपाई दाव्यांशी संबधीत प्राप्त आकडेवारी (data) राष्ट्रीय पिक विमा पोर्टल (NCIP) नुसार अंतिम राहील व सदरची आकडेवारी ही एकल माहितीस्त्रोत (Single Source of Data) असेल.
  • शेतकरी मित्रांनो तुमच्या पिकाचे नुकसान झाले असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये क्रॉप इन्शुरन्स नावाचे एप्लीकेशन डाउनलोड करून या एप्लीकेशन द्वारे विमा कंपनीला कळवू शकता. त्यासाठी खालील प्रक्रिया करणे आवश्यक आहे.
  • सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोर वरून क्रॉप इन्शुरन्स नावाचे एप्लीकेशन डाउनलोड करा.
  • तुमच्या मोबाईल मध्ये हे ॲप्लिकेशन उघडल्यानंतर सर्वप्रथम continue as guest या बटनावर क्लिक करा.त्याआधी उजव्या बाजूला दिसत असलेल्या तीन डॉट वर क्लिक करून भाषा बदलून घ्या.
  • त्यानंतर यामध्ये तुम्हाला 5 ऑप्शन दिसतील 
  • 1. पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्ही भरलेल्या पिक विमाचा तपशील तुम्हाला पाहता येईल. त्यासाठी status of insurance policy यावर क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज क्रमांक व खालील बॉक्समध्ये दिलेल्या कॅपच्या टाकून तुम्ही तुमच्या भरलेल्या पिक विमाचा तपशील पाहू शकता.
  • 2. दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्ही विमा प्रीमियम जाणून घेऊ शकता.
  • ३.तिसऱ्या पर्यायामध्ये तुम्ही तुमच्या पिकांचे नुकसानभरपाईसाठी विमा कंपनीला दावा करू शकतात.त्यासाठी crop loss या बटणावर क्लिक करा. यामध्ये crop loss intimation म्हणजे पीक नुकसान दावासाठी येथे क्लिक करा. crop loss status यामध्ये तुम्ही केलेल्या दाव्याचा तपशील पाहू शकता.
  • crop loss intimation म्हणजे पीक नुकसान दावासाठी यावर क्तुलिक करा तुमचा विमा नोंदणी मोबाईल नंबर टाका आणि आलेला OTP ओटीपी टाका.
  • त्यानंतर हंगाम,वर्ष,योजनेचे नाव,राज्य निवडा.
  • त्यानंतर आता तुमची पिकाची झालेली नुकसान माहिती भरून फॉर्म सबमिट करा.
  • तुम्ही दावा सबमिट केल्यानंतर लगेच तुम्हाला दावा केल्याबद्दलचा संदेश प्राप्त होईल.

हेही वाचा.

PMFBY- प्रधानमंत्री पीक विमा योजना |पिक विमा कागदपत्रे,अटी व पात्रता,रक्कम,कालावधी,चुका,तक्रार,सर्व प्रश्नाची उत्तरे|फॉर्म भरण्याआधी महत्वाची माहिती

Leave a Comment

You cannot copy content of this page