नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा फक्त एक रुपया मध्ये करता येणार आहे. त्यासाठी विमा भरताना शेतकऱ्यांना याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी एक रुपया मध्ये पिक विमा योजना सुरू केली आहे. त्यामुळे आता शेतकरी पिक विमा योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात खरीप हंगाम 2024 साठी शेतकऱ्यांना पिक विमा भरण्याची सुरुवात 18 दिन पासून चालू केलेली आहे. पिक विमा योजनेत मागील वर्षी एक कोटी 70 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता.
PMFBY कागदपत्रावर तफावत आढळल्यास फॉर्म नाकारला जाणार
पिक विमा भरताना यावर्षी नवीन नियम आला आहे. असे समजा ज्या शेतकऱ्याचे आधार कार्ड, पासबुक व सातबारा वर नाव सारखे नाहीत किंवा थोडा फरक आहे.ज्यांचे इग्रजीत नाव जुळत नाही.अशांचे पिक विमा भरण्याआधी आपले नाव दुरुस्ती करून घ्यावे.तुमचे नाव हे आधार कार्ड,बँक पासबुक,सातबारा वर नाव समान असणे आवश्यक आहे.कोणत्याही एका कागदपत्रावर नावामध्ये बदल असल्यास फॉर्म नाकरले जाणार आहे.उदा. राम – रामराव, बालाजी – बालासाहेब – बाळू, ज्ञानेश्वर ज्ञानदेव, प्रभू-प्रभाकर, सरुबाई – सरस्वती, चंपाबाई- चंफाबाई, महादू – महादेव, रौफ – रऊफ, कासिम – काशिम, बाबू – बाबुसाब असे अनेक उदाहरण आहेत.
PMFBY योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी तारखेच्या आत नोंदणी करणे अनिवार्य
PMFBY प्रधानमंत्री पिक विमा योजना: या योजनेत शेतकऱ्यांना एक रुपया मध्ये काढता येणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या नावावर सातबारा आधार कार्ड बँक पासबुक व पिक पेरा उपलब्ध करून शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन फॉर्म भरणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी अंतिम तारखेची वाट न बघता आपल्या शेतात पेरणी झाल्याबरोबर लगेच पिक विमा भरून घ्यावा. जर तुमच्याकडे ऑनलाइन फॉर्म भरण्याची यंत्रणा नसेल तर तुम्ही तुमच्या जवळील सेतू सुविधा केंद्र सीएसटी सेंटर येथे जाऊन ऑनलाईन फॉर्म भरू शकता. ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी www.pmfby.gov.in या संकेत स्थळाला भेट देऊ शकता. ऑनलाईन फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2014 आहे.
PMFBY पिक निहाय विमा संरक्षित रक्कम,हेक्टरी इतके मिळणार अनुदान
कांदा -रु. ४६००० ते ८१४२२, ज्वारी -रु.२०००० ते ३२५००, कापूस – रु. २३००० ते ५९९८३, बाजरी -रु १८,००० ते ३३,९१३, मका -रु ६००० ते ३५५९८, तूर -रु २५००० ते ३६८०२, उडीद -रु. २०००० ते २६०२५, मुग – रु २०००० ते २५८१७, भुईमुग -रु. २९००० ते ४२९७१, सोयाबीन -रु. ३१२५० ते ५७२६७, तीळ -रु. २२००० ते २५०००, कारळे – रु. १३७५०, भात- रु.४०००० ते ५१७६०,नाचणी -रु. १३७५० ते २००००.
PRADHAN MANTRI FASAL BIMA YOJANA तुमच्या कोणत्याही समस्या किंवा अडचणी सोडवण्यासाठी तुम्ही अधिक माहितीसाठी केंद्र शासनाच्या कृषी विभाग हेल्पलाइन क्रमांक १४४४७ किंवा स्थानिक कृषी विभाग कार्यालय संपर्क करू शकता.
PMFBY पिक विमा संरक्षणाच्या बाबी
PMFBY पिक पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकामध्ये पेरणीपासून ते लावणीपर्यंत झालेले नुकसान, काढली पश्चात पिकाची नुकसान, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान, हंगामातील अप्रतिकुल परिस्थितीमुळे झालेले नुकसान अशा नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत पिक विमा नोंदणी पावतीवर सर्वात खाली दिलेल्या विमा कंपनीला दावा Crop Insurance मोबाईलच्या या एप्लीकेशन द्वारे करू शकतात.
PIK VIMA पिक विमा नुकसान भरपाई निश्चित करणेसाठी सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे
- शेतकऱ्याने नुकसान भरपाईचा दावा दाखल करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह (७/१२, पिकाची नोंद असलेला विमा हप्ता भरल्याचा पुरावा इ.) विमा कंपनीस सादर करणे आवश्यक आहे.
- शेतकरी परिपुर्ण माहितीसह विहित नमुन्यातील अर्ज सादर करू न शकल्यास उपलब्ध माहितीच्या आधारे अर्ज सादर करू शकतो, परंतु अर्जातील उर्वरीत माहिती ७ दिवसांच्या आत विमा कंपनीस सादर करणे आवश्यक राहील.पीक नुकसानीचा पुरावा म्हणून मोबाईल फोनवरील प्रणालीद्वारे घेतलेली छायाचित्रे देता येतील. याबरोबरच भारतीय हवामान विभागाचे अहवाल, प्रसार माध्यमातील बातम्या आदि तपशील सहपत्रित करता येईल.
- नुकसान निश्चिती व अहवाल सादर करणे.विमा कंपनीने माहिती प्राप्त झाल्यापासून ४८ तासांच्या आत नुकसानीचे मुल्यांकन निश्चित करण्यासाठी विहित अनुभव व शैक्षणिक पात्रतेच्या निकषानुसार पर्यवेक्षकाची नियुक्ती करावी.
- यामध्ये कोणत्याही विषयाची पदविका व दोन वर्षाचा अनुभव किंवा कृषि व संलग्न विषयाची पदवी व १ वर्षाचा अनुभव अपेक्षित आहे.त्याचप्रमाणे सेवानिवृत्त कृषि / फलोत्पादन / कृषि विस्तार शाखेचे अधिकारी, सेवानिवृत्त बँक अधिकारी ज्यांना पीक कर्ज वाटपाचा अनुभव आहे त्यांची नियुक्ती करता येईल.
- पीक नुकसानीचे सर्वेक्षण संयुक्त समिति मार्फत करण्यात येईल ज्यात विमा कंपनीचा पर्यवेक्षक, तालुका स्तरावरील कृषि अधिकारी आणि संबंधित शेतकरी यांचा समावेश असेल.
- पुढील १० दिवसांच्या आत नुकसानीचा अहवाल तयार करण्यात यावा.नुकसानीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत (विमा हप्ता जमा झाला आहे या अटींचे अधिन राहून) नुकसान भरपाई देण्यात यावी.
- काढणीपश्चात जोखीमकरीता, जर अधिसुचित पिकाचे बाधीत क्षेत्र हे एकूण पेरणी क्षेत्राच्या २५ टक्के पेक्षा जास्त असेल तर अधिसुचित क्षेत्रातील सर्व पात्र शेतकरी हे काढणीपश्चात नुकसान भरपाई मिळण्यास पात्र राहतील.
- स्थानिक आपत्तीच्या जोखीमकरीता, जर बाधीत क्षेत्र हे अधिसुचित विमा क्षेत्राच्या २५ टक्के पर्यन्त असेल तर वैयक्तिक स्तरावर व २५ टक्के पेक्षा जास्त असेल तर अधिसुचित क्षेत्रातील पात्र शेतकऱ्यांना (विमा योजनेत सहभागी झालेले व पिकाचे नुकसान विहित वेळेत पूर्वसूचना दिलेले) नुकसान भरपाईस पात्र ठरेल.
- नुकसानीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत विमा कंपनी अनुदेय नुकसान भरपाई अदा करेल.
- स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबी अंतर्गत पिक नुकसानीच्या सूचना कापणीच्या तारखेपर्यंत देता येतील.सर्वसाधारण कापणीच्या १५ दिवसांच्या दरम्यान स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षणद्वारे येणारे मूल्यांकन आणि पिक कापणी प्रयोगाची उत्पादकता यांना ५०:५० भारांकन देऊन नुकसान भरपाई निश्चित करण्यात येईल.