WhatsApp Group Join Now

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी व शर्तीमध्ये झाले हे महत्वाचे बदल|majhi ladki bahin yojna important changes to the terms and conditions

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी व शर्तीमध्ये झाले हे महत्वाचे बदल

  • सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दि. १ जुलै, २०२४ ते १५ जुलै, २०२४ पर्यंत ठेवण्यात आली होती.
  • या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत २ महिने ठेवण्यात येत ‘ती दि. ३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल.
  • तसेच दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि. ०१ जुलै, २०२४ पासून दर माह रु.१५००/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.
  • योजनेच्या पात्रतेसाठी वय आधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे .
  • लाभार्थी महिलेकडे वय आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी १५ वर्षापूर्वीचे  रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा  शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा  जन्म दाखला या ४ पैकी कोणतेहे एक ओळखपत्र / प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत.
  • सदर योजनेतून ५ एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.
  • सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष वयोगटची मर्यादा ऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट आलेली आहे.
  • परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला किंवा  शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल.
  • जर रु.२.५ लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येणार आहे.
  • सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज कोठे करायचा?

ऑफलाईन व ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे.ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला नारी शक्ती दूध हे ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करायचे आहे. त्यानंतर यामध्ये अर्जदाराचा मोबाईल क्रमांक टाकून लॉगिन करून फॉर्म मध्ये उपलब्ध असलेली माहिती भरून फॉर्म ऑनलाईन सबमिट करायचा आहे. जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही दिलेल्या ऑफलाइन फॉर्म मध्ये सर्व माहिती भरून ऑफलाईन अर्ज करण्यासाठी शासनाच्या दिलेल्या फोर्ममध्ये सर्व माहिती भरून कागदपत्रे जोडून शहरी व ग्रामीणसाठी अंगणवाडी सेविका/ पर्यवेक्षिका/ग्रामपंचायत/ग्रामसेवक/मुख्यसेविका/ वार्ड अधिकारी यांच्याकडे जमा करायचे आहे.त्यानंतर ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी नारी शक्ती दूत या मोबाईल अप्लिकेशन द्वारे पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे.

2 thoughts on “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी व शर्तीमध्ये झाले हे महत्वाचे बदल|majhi ladki bahin yojna important changes to the terms and conditions”

Leave a Comment

You cannot copy content of this page